cash sakal
महाराष्ट्र बातम्या

मोठी बातमी! सोलापुरातील मोहरम कमिट्या बेकायदा, वर्गणी गोळा करण्याचा नाही अधिकार; सोलापूरच्या जिल्हा वक्फ अधिकाऱ्यांचा अभिप्राय; जेलरोड पोलिस म्हणाले...

सोलापूर शहरातील मोहरम कमिटीत मतभेद निर्माण झाले आणि मकबूल मोहोळकर हे बेकायदा वर्गणी गोळा करीत असल्याची तक्रार जेलरोड पोलिसांकडे करण्यात आली. त्यावर पोलिसांनी जिल्हा वक्फ अधिकाऱ्यांकडे त्यासंदर्भात पत्राद्वारे विचारणा केली. त्यावेळी जिल्ह्याच्या वक्फ अधिकाऱ्यांनी मोहरम कमिटीचे अध्यक्षपद आम्ही कोणालाही दिले नसल्याचे उत्तर कळविले.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूर शहरातील मोहरम कमिटीत मतभेद निर्माण झाले आणि मकबूल मोहोळकर हे बेकायदा वर्गणी गोळा करीत असल्याची तक्रार जेलरोड पोलिसांकडे करण्यात आली. त्यावर पोलिसांनी जिल्हा वक्फ अधिकाऱ्यांकडे त्यासंदर्भात पत्राद्वारे विचारणा केली. त्यावेळी जिल्ह्याच्या वक्फ अधिकाऱ्यांनी मोहरम कमिटीचे अध्यक्षपद आम्ही कोणालाही दिले नसल्याचे उत्तर कळविले. या पार्श्वभूमीवर जेलरोड पोलिसांनी कागदावरील दोन्ही कमिट्यांना वर्गणी गोळा न करण्याचे आदेश दिले आहेत.

सोलापूर शहरात दरवर्षी मोहरम उत्साहात साजरा केला जातो. यावेळी पंजांची (सवारी) मिरवणूक काढली जाते. या उत्सवासाठी मोहरम कमिटीचे पदाधिकारी असल्याचे सांगून मुस्लिम बांधवांकडून वर्गणी गोळा करतात. मकबूल मोहोळकर हे अधिकार नसताना बेकायदा वर्गणी गोळा करतात, अशी तक्रार मुसा मुर्शद यांनी केली होती.

याअनुषंगाने जेलरोड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राचप्पा चानकोटी यांनी या तक्रार अर्जाची चौकशी केली. त्यानंतर जिल्हा वक्फ अधिकाऱ्यांना पत्र पाठवून सध्या मोहरम कमिटीचे अध्यक्ष कोण आहेत, यासंदर्भात विचारणा केली. त्यावेळी, आम्ही कोणालाही मोहरम कमिटीचे अध्यक्षपद दिले नसल्याचे वक्फ अधिकाऱ्यांनी पोलिसांना कळविले. त्या पत्रावरील उत्तर पोलिसांनी मोहोळकर व मुर्शद या दोघांनाही पाठविले आहे. अधिकार नसताना वर्गणी गोळा करता येणार नाही, तक्रार प्राप्त झाल्यास खंडणीचा गुन्हा दाखल होऊ शकतो, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

१९५४ साली स्थापन झाली मोहरम कमिटी

मकबूल मोहोळकर यांच्या नातलगांनी १९५४ साली सोलापूर शहरात मोहरम कमिटी स्थापन केली होती. पण, सध्या कमिटीचे तत्कालीन एकही सदस्य हयात नाही. आता वर्गणी गोळा करण्याचा अधिकार कोणाचा, कमिटीचे अध्यक्षपद कोणाकडे, यातून दोन गट तयार झाले. त्यातून पोलिसांकडे तक्रार झाली होती. आता पोलिसांनी जिल्हा वक्फ अधिकाऱ्यांचे पत्र जोडून छत्रपती संभाजीनगर येथील वक्फ बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे देखील विचारणा केली आहे. पण, पाच महिने होऊनही त्यांच्याकडून कोणतेही उत्तर मिळाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

मोहरमनिमित्त पोलिस आयुक्तालयात बैठक

सोलापूर शहरात १७ ते २६ जून या काळात मोहरम साजरा केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी (ता. ८) पोलिस आयुक्तालयात शांतता कमिटी व शहर काझी, मौलाना, मुस्लिम बांधवांची बैठक पार पडली. यावेळी पोलिस आयुक्त एम. राज कुमार, पोलिस उपायुक्त प्रीतम यावलकर, डॉ. अश्विनी पाटील, वृष्टी जैन, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्यासह आरटीओ, धर्मादाय आयुक्तालय, अग्निशामक विभागाचे अधिकारी उपस्थित होते. पोलिस आयुक्तांनी सर्वांना कायद्याचे उल्लंघन होणार नाही, याची दक्षता घ्यावी, सर्वांनी सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नका, मिरवणूक मार्गांवरील धार्मिक स्थळांसमोर नाचगाणी करू नये, विनापरवाना कोणीही मिरवणूक काढू नये, रस्त्यावर मंडप मारताना, सरबत वाटताना रस्त्याला अडथळा होणार नाही, याची खबरदारी घ्यावी, अशा सूचना केल्या. महापालिकेने मुस्लिम बांधवांच्या अडचणी जाणून घेऊन त्या वेळेत सोडविण्याची ग्वाही दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Garden Waste Scam : पुणे महापालिकेच्या उद्यान कचरा प्रकल्पात ३८ कोटींचा गैरव्यवहार? माजी नगरसेवकांचा ठेकेदारावर गंभीर आरोप

Police Negligence: संशयिताऐवजी भलत्यालाच अटक; ज्येष्ठाची ८८ दिवस कारागृहात ससेहोलपट ; राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांचा आरोप

NEET Protest: बिहार सरकार आंदोलकांसमोर झुकलं! गुन्हे मागे घेण्याचा निर्णय, अटकेत असलेल्यांची सुटका

RTE Admissions Probe: आरटीई प्रवेशातील गैरप्रकारांवर सर्वत्र चौकशी; जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांची सभेत ग्वाही

Pune HCMTR Ring Road : पुण्यातील वाहतूक प्रकल्पांना गती; एचसीएमटीआर, रिंगरोड व पाताळलोक बोगद्यांसाठी मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट आदेश

SCROLL FOR NEXT