Congress leader Nana Patole, Balasaheb Thorat And BJP Leader Devendra Fadanvis Team eSakal
महाराष्ट्र बातम्या

काँग्रेसच्या विनंतीला भाजपाचा मान, राज्यसभा निवडणूक होणार बिनविरोध

भाजपचे संजय उपाध्याय आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार आहेत.

रश्मी पुराणिक

मुंबई: राज्यसभेची पोटनिवडणूक (rajya sabha byelection) बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. काँग्रेसच्या (congress) विनंतीला भाजपने (bjp) मान दिला आहे. संजय उपाध्याय (sanjay upadhyay) आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार आहेत. काँग्रेसचा नेत्या रजनी पाटील यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड होणार आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी मागच्या आठवड्यात राज्यातील काँग्रेस (congress) नेत्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांची भेट घेतली होती.

काँग्रेसचे दिवंगत खासदार राजीव सातव (rajiv satav) यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक होत आहे. महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या रजनी पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. काँग्रसेच्या उमेदवार रजनी पाटील यांना बिनविरोध निवडून आणण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांनी गुरुवारी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती.

काँग्रेसने विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या घरी जाऊन लोटांगण घातल्यामुळे महाविकास आघाडीतील इतर नेते नाराज झाल्याची चर्चा होती. निवडणूक बिनविरोध करायची असेल, तर त्या बदल्यात १२ आमदारांचे निलंबन रद्द करण्याची देवेंद्र फडणवीसांनी मागणी केल्याची चर्चा होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सीजेपीच्या 'तिरंगा मार्च'ला आडकाठी! दिल्लीतील सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा निर्णय; अभिजित दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, '100 ठिकाणी...'

Drunk and Driver : कोथरूडमध्ये ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’चा थरार; तीन ते चार जण किरकोळ जखमी, २४ वर्षीय कारचालक विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात

Mangalwedha News : मंगळवेढा तालुक्यात 4777 कुटुंबाचे धान्य ऐन दुष्काळात बंद

Manchar Water Issue : आंबेगाव तालुक्यात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईवर तातडीने नियोजन करा; प्रांताधिकारी अर्चना तांबे यांचे अधिकाऱ्यांना आदेश

PM नरेंद्र मोदींना भेटले Asiad पदकविजेते भारतीय खेळाडू, वैभव सूर्यवंशीच्या रिअॅक्शनचा Video होतोय Viral

SCROLL FOR NEXT