Vijay Wadettiwar 
महाराष्ट्र बातम्या

उदयनिधी यांच्या सनातनबाबतच्या विधानावरून भाजप आक्रमक; वडेट्टीवार म्हणाले, मोदींना...

रवींद्र देशमुख

मुंबई : तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याने खळबळ उडाली आहे. या वक्तव्यावर उदयनिधी यांनी स्पष्टीकरण दिले आहे. मात्र भाजपकडून उदयनिधी यांच्यावर कडाडून टीका करण्यात येत आहे. भाजपकडून करण्यात येत असलेल्या मुद्दावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

वडेट्टीवार म्हणाले की, आपण मागील ९ वर्षांच्या काळात काहीही केलं नाही हे पंतप्रधान मोदींना माहित आहे. केवळ धर्मांध आणि जातीव विष पेरल्याने यश मिळत हे भाजपला माहित आहे. त्या दृष्टीने पंतप्रधान विधाने करत आहे.

सनातनचा इंडियाशी काही संबंध नाही. सनातनचा विषय तामिळनाडूत काढण्यात आला होता. आपल्याकडे केवळ विषय उचलायचं काम सुरू आहे. कर्नाटकमध्ये बजरंगबलीचा विषय काढला. पण तिथं निकाल काय आला, हे सर्वांना माहित आहे. देशात तेढ निर्माण होईल, अशी भावना असेल तर ते देशाला परवडणारे नसल्याचं वडेट्टीवार यांनी म्हटलं.

दहीहंडीचे नियोजन ही भाजपची स्टंटबाजीच आहे. मुंबईची तिजोरी खाली केली, एफडी मोडल्यात, आमदार-खासदारांना लाखो करोडो रुपये दिलेत. माजी नगरसेवकांना वीस-पंचवीस कोटी रुपये दिलेत. इतके वर्षे झालेत जेवढी तिजोरी भरली तेवढी खाली करण्याचं पाप केलं गेलं. आता त्याच पैशातून कमिशन खाऊन दहीहंडी साजरी केली जाते, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

स्कॉर्पिओला आग लागून एकाच कुटुंबातील चौघांचा अंत, मृतांमध्ये ZP सदस्यासह २ माजी सरपंचाचा समावेश

Latest Marathi News Live Update : मनोज जरांगेंची पत्रकार परिषद! 30 मे पासून आमरण उपोषण

Badlapur Crime: बदलापुरात वडिलांच्या मित्रानेच १६ वर्षीय मुलीचा केला विनयभंग, मोबाईल चार्जिंगसाठी घरी आला अन्...

Deepali Sayyad Claims : ‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’वरून खळबळ! दिपाली सय्यदला धमक्या, “ते नाव घेतलं तर सर्व काही संपेल...”

Kolhapur Student Death Case : बाबा दुप्पट फायदा मिळणार आहेत, पैसे पाठवा..., मुलीचे शेवटचे शब्द, कुटुंबीयांनी नाकारलं विद्यार्थिनीने नको ते केलं

SCROLL FOR NEXT