fadnavis e sakal
महाराष्ट्र बातम्या

VIDEO : नागपुरात भाजपचे आंदोलन, फडणवीस पोलिसांच्या ताब्यात

भाग्यश्री राऊत

नागपूर : ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणासाठी भाजपच्यावतीने आज व्हेरायटी चौकात चक्काजाम आंदोलन (BJP agitation for obc reservation) करण्यात आले. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (opposition leader devendra fadnavis) यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी राजकीय बळी गेला तरी चालेल पण ओबीसींचं राजकीय आरक्षण परत घेऊनच राहू, अशी ठाम भूमिका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. यावेळी देवेंद्र फडणवीसांसह अनेक भाजपच्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. (BJP agitation for obc reservation devendra fadnavis on obc reservation in nagpur)

नागपुरात व्हेरायटी चौकात आंदोलन करताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, ओबीसी नेते चंद्रशेखर बावनकुळेंसह भाजपचे कार्यकर्ते

ओबीसीला संविधानात भाजपने जागा दिली. ही जागा काँग्रेस राष्ट्रवादीने दिली नाही. आम्ही ओबीसीसाठी वेगळं खातं आम्ही तयार केलं. या आरक्षणाचे खरे मारेकरी कोण आहेत? तर दोन जणांनी ओबीसी आरक्षणविरोधात याचिका केली होती. त्यापैकी वाशिममधल्या काँग्रेसच्या आमदाराचा मुलगा आणि भंडाऱ्याचा काँग्रेसचा कार्यकर्ता आहे. मग ओबीसी आरक्षण रद्द करणारे हे काँग्रेस आहे, अशी टीकाही फडणवीसांनी केली.

महाविकास आघाडी सरकारच्या दुर्लक्षामुळे ओबीसी समाजाचे आरक्षण हिरावल्याचा आरोप भाजपचा आहे. सर्वोच्च न्यायालयाने मागासवर्गीय आयोग स्थापन करून ओबीसी समाजाचा इम्पेरिकल डाटा सादर करण्यास सांगितले होते. मात्र, तब्बल पंधरा महिने सरकारने टाळाटाळ केली. त्यामुळे न्यायालयाने ओबीसींचे राजकीय आरक्षण काढून घेतले आहे. ओबीसी समाजाला पुन्हा आरक्षण बहाल करावे. ओबीसी आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आमची लढाई सुरू राहणार, असेही ते म्हणाले. यावेळी महापौर दयाशंकर तिवारी, खासदार डॉ. विकास महात्मे,आमदार क्रृष्णा खोपडे, मोहन मते, विकास कुंभारे, गीरिश व्यास, संगठन मंत्री डॉ उपेंद्र कोठेकर, महापालिकेतील सत्तापक्षनेते अविनाश ठाकरे आदी नेते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kagal NH48 Bridge : कागलकरांचं स्वप्न होणार पूर्ण! 295 कोटींचा 50 पिलरचा भव्य उड्डाणपूल; देशातील सर्वात सुंदर पूल साकारणार, मंत्री मुश्रीफ यांची पायाभरणीवेळी ग्वाही

Koyna Dam Water Storage 100 TMC : 'कृष्णा'काठी जलसंकट टळले! 'कोयने'त 100, तर 'चांदोली'त 34 टीएमसी साठा; शेतीसाठी पुरेसे पाणी

Asia Cup 2026: दीप्ती शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड अन् भारतीय संघाची विजयी सुरुवात! प्रतिस्पर्ध्यांना ६५ धावांवर केलं ऑलआऊट

Nepal Flood: नेपाळच्या मदतीला भारत धावला! महापुरामुळे वीज संकट; मागणीनुसार अतिरिक्त वीजपुरवठा करणार

Asia Cup 2026: बलाढ्य टीम इंडिया शफालीच्या फिफ्टीनंतरही थायलंडसमोर ढासळली; किती धावांचे ठेवले टार्गेट?

SCROLL FOR NEXT