chandrakant patil esakal
महाराष्ट्र बातम्या

''काँग्रेस-राष्ट्रवादीची काय औकात, भांडण लावून सत्तेत आले''

कार्तिक पुजारी (Kartik Pujarai)

मुंबई- भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी साम टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर बोचरी टीका केली आहे. भाजप-शिवसेनेचे भांडण लावून काँग्रेस-राष्ट्रवादी सत्तेत आली, नाहीतर काय यांची औकात. एकाचे ४४ आणि दुसऱ्याचे ५४. आणि दुसऱ्यांचे २०-२२. अपघाताने काँग्रेस राष्ट्रवादी सत्तेत आली. या पक्षाची संस्कृतीच भांडणं लावण्याची आणि पाडापाडी करण्याची आहे. संशय निर्माण करणे, जातीजातींमध्ये भांडण लावणे. राज ठाकरे काही चुकीचं बोलले नाहीत. काँग्रेसचे एक मंत्री मला म्हणाले की, उद्धव ठाकरेंनी उद्या चौकात जाऊन थोबाडीत मारले तरी आम्ही बाहेर नाही पडणार. इतकी सत्ता त्यांना प्यारी आहे. कोणत्याही प्रयत्नाशिवाय त्यांना सत्ता मिळाली आहे. त्यामुळे ते सत्ता सोडणार नाहीत, असं चंद्रकात पाटील म्हणाले आहेत.

शिवसेना आणि भाजपमधील भांडण पाहून काँग्रेस-राष्ट्रवादी मजा घेत होते. हॉटेलमध्ये सेलिब्रेशन करत होते. सख्ये भाऊ कसे भांडताहेत, कसे एकमेकांचे कपडे फाडत आहेत, एकमेंकांच्या उरावर बसत आहेत. हे पाहून मजा घेत होते. भाजपकडून काही घडलं झाली नाही असं म्हणणार नाही, पण अंडे आधी की कोंबडं आधी हा प्रश्न आहे. २०१४ मध्ये आम्ही एकमेकांना खूप शिव्या दिल्या, पण पुन्हा पाच वर्ष युती केली. त्यामुळे राजकारणात कधीच पूर्णपणे फाटत नाही, असं सूचक वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.

माझा सल्ला किंवा सूचना नाही पण एक इच्छा आहे की, उद्धव ठाकरेंनी हा डाव समजून घ्यावा. दिर्घकालीन राजकारणासाठी हे ठीक आहे का? राष्ट्रवादीची काय स्थिती आहे हे पाहावं. कितीही मारामारी झाली तरी सख्खा भाऊ-सख्खा भाऊच राहतो. तो सावत्र भाऊ होत नाही. काहीही आरोप झाले तरी शेवटी ते भाऊच राहणार आहेत. आम्ही हिंदूत्वाच्या रक्ताचे एक भाऊ आहोत. पण, काल खूप भांडणं झाली. पण तरी सख्खे भाऊ आहोतच, असंही पाटील म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सीजेपीच्या 'तिरंगा मार्च'ला आडकाठी! दिल्लीतील सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा निर्णय; अभिजित दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, '100 ठिकाणी...'

Drunk and Driver : कोथरूडमध्ये ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’चा थरार; तीन ते चार जण किरकोळ जखमी, २४ वर्षीय कारचालक विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात

Mangalwedha News : मंगळवेढा तालुक्यात 4777 कुटुंबाचे धान्य ऐन दुष्काळात बंद

Manchar Water Issue : आंबेगाव तालुक्यात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईवर तातडीने नियोजन करा; प्रांताधिकारी अर्चना तांबे यांचे अधिकाऱ्यांना आदेश

PM नरेंद्र मोदींना भेटले Asiad पदकविजेते भारतीय खेळाडू, वैभव सूर्यवंशीच्या रिअॅक्शनचा Video होतोय Viral

SCROLL FOR NEXT