महाराष्ट्र बातम्या

राणेंना जामीन म्हणजे ठाकरे सरकारला आणखी एक चपराक - भाजप

नामदेव कुंभार

केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर राज्यभर अभूतपूर्व महा‘राडा’ झाला. एकीकडे शिवसेना भाजपचे कार्यकर्ते रस्त्यांवर परस्परांना भिडले असताना राज्य सरकारने राणे यांना अटक केली. या घटनेचे गल्लीपासून दिल्लीपर्यंत तीव्र पडसाद उमटले. राणे यांना रात्री उशिरा महाड सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. सुमारे सव्वा तासाच्या सुनावणीनंतर न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. यानंतर भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जामीन म्हणजे राज्यातील सरकारला बसलेली आणखी एक चपराक आहे, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटीली यांनी दिली आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, 'केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना कोर्टाने दिलेला जामीन म्हणजे राज्यातील सरकारला आणखी एक चपराक आहे. पोलिसांच्या आणि भाडोत्री गुंडांच्या जोरावर राज्यातलं सरकार चाललं आहे.' राणे यांची जन आशीर्वाद यात्रा सुरूच राहणार असे सांगताना सिंधुदुर्ग जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या संचारबंदीवरही पाटील यांनी तीव्र आक्षेप घेतला.

राज्यातील महाविकास आघाडी सरकार सूडबुद्धीने वागत आहे. या सरकारला सत्तेची नशा चढली आहे. गेल्या 19 महिन्यांत अनेक वेळा कोर्टाच्या थपडा खाऊनही काहीच बदल झालेला नाही, आज पुन्हा एकदा कोर्टाची चपराक खावी लागली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना न्यायालयाने जामीन मंजूर केल्याने अखेर सत्याचा विजय झाला आहे. मविआ घटकपक्ष शिवसेनेने सूडबुद्धीने,आततायी कारवाई करून नारायण राणे यांना अटक केली, संसदीय संकेतांना हरताळ फासला आणि द्वेषाचे राजकारण टोकाला नेले,यासाठीही हा दिवस नेहमीच स्मरणात राहील, अशी तोफ चंद्रकांत पाटील यांनी डागली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

SCROLL FOR NEXT