BJP devendra fadnavis first reaction On Sharad Pawar Resigns as ncp chief maharashtra Politics  
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar Resigns : शरद पवारांनी राष्ट्रवादीचं अध्यक्षपद सोडलं; देवेंद्र फडणवीस म्हणाले की…

रोहित कणसे

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदापासून निवृत्ती जाहीर केली.यामुळं राष्ट्रवादीत खळबळ माजली असून त्यांच्या निर्णयाचे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे.

या दरम्यान भाजपचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवारांच्या या निर्णयानंतर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. तसेच शरद पवार यांनी त्यांच्या लोक माझे सांगाती या पुस्तकात केलेल्या खुलाशांबद्दल देखील फडणवीस बोलले आहेत.

अजित पवार यांनी भाजपसोबत जात पहाटे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ का घेतली? त्यानंतर अजित अजित पवार यांचं बंड कसं थोपवलं याचा सविस्तर उल्लेख शरद पवार यांचं आत्मचरित्र लोक माझे सांगाती मध्ये करण्यात आला आहे.

फडणवीस म्हणाले की, पवार साहेबांचं पुस्तक मी वाचलं नाही, त्यामुळं मी त्यावर आता बोलणार नाही. पण मलाही एक पुस्तक लिहीयचं आहे. योग्य वेळी मी ते लिहीणार आहे. त्यामुळे नेमकं त्यांनी काय म्हटलंय आणि मला काय वाटतं याबद्दल नेमकं सत्य काय आहे, यासारख्या अनेक गोष्टी मी पुस्तक लिहीन त्यातून तुम्हाला कळतील असे फडणवीस म्हणाले आहेत.

शरद पवारांच्या अध्यक्षपद सोडण्याच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना फडणवीसांनी हा त्यांच्या वयक्तिक निर्णय असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, पवार साहेबांचा निर्णय हा राष्ट्रवादीचा अंतर्गत बाब आहे. तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. ते ज्येष्ठ नेते असून त्यांनी काहीतरी ठरवले आहे. त्यांच्या पक्षात अनेक मुद्द्यांवर विचारमंथन सुरू आहे. त्यामुळे यावर प्रतिक्रिया देणे योग्य ठरणार नाही. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवू आणि एक-दोन दिवसांनी प्रतिक्रिया देऊ असे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Protest : आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांचा विद्यार्थ्यांना पाठिंबा, म्हणाले- संवादाचा अभाव कोणाच्याही हिताचा नाही

Navi Mumbai Municipal Schemes: प्रशिक्षणानंतर थेट नोकरी देण्याचा प्रयत्न, नवी मुंबई पालिकेचा विविध योजनांचा धमाका

शरद पवारांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट, दिल्लीत घडामोडींना वेग; सुप्रिया सुळेही सोबत, काय झाली चर्चा?

NEET वादावरून धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा का घेतला जात नाही?; मोदी सरकारच्या भूमिकेची Inside Story... 8 प्रमुख कारणे

Live Updates Marathi : भाजप सरकार गोरगरिबांवर लाठ्या चालवतं; मनोज जरांगेंनी जंतर मंतरवर व्यक्त केला संताप

SCROLL FOR NEXT