narayan rane 
महाराष्ट्र बातम्या

संजय राऊतांमुळे शिवसेना खड्ड्यात; नारायण राणेंचा प्रहार

कार्तिक पुजारी

सिंधुदुर्ग- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझी केंद्रीय मंत्री म्हणून निवड केली. पंतप्रधान मोदी यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे जनआशीर्वाद यात्रा काढण्यात आली आहे. सरकारने केलेल्या कामाची माहिती या यात्रेच्या माध्यमातून देण्यात येत आहे. जनआशीर्वाद यात्रेला दहा दिवस झालेत. लोकांनी मोठा प्रतिसाद दिला. लोकांनी खूप गर्दी केली, रिकॉर्ड ब्रेक गर्दी झाली. पत्रकारांनी मला खूप प्रसिद्धी दिली. पैसे देऊनही इतकी प्रसिद्धी मिळत नाही. यासाठी पत्रकारांचे मी आभार मानतो, अशी उपहासात्मक टिप्पणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

यात्रेत मध्ये अपशकुन झाला. मांजर आडवी गेली, मी त्याची दखल घेत नाही. अग्रलेख येतायत, माझ्या मुलांबद्दल बोललं जातंय. पण, आधी आपली मुलं बघा. संजय राऊतांना म्हणा तुझ्या मालकांची मुलं काय करताहेत ते बघा. संजय राऊतांमुळे सेना लयाला गेली. माझ्या मुलांबाबत बोलू नका, माझी मुलं चांगली आहेत. कोणतीही वाईट गोष्ट त्यांच्याकडून घडणार नाही. दोन्ही मुलांचे माझ्यावर प्रेम आहे. माझे त्यांच्यावर नियंत्रण आहे. माझ्या मुलांवरील टीका थांबली पाहिजे. हे थांबल नाही, तर माझ्या प्रहार मधून सुरू करेन. कोणाचं उठण बसणं, काय करता, कोणत्या केस मध्ये काय आहे याची सर्व मला माहिती आहे, अशी टीका त्यांनी शिवसेनेवर केली.

नारायण राणे म्हणाले की, 'जन आशीर्वाद यात्रेचा आज दहावा दिवस आहे. मुंबई ते सिंधुदुर्ग अशी ही यात्रा सुरू आहे. लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिलाय, उशिरा मी जाऊनही लोक थांबत होते. मला मोठी प्रसिद्धी पत्रकार मित्रांनी दिली. पैसे देऊनही एवढी प्रसिद्धी मिळत नाही. रोजगार निर्माण करणारा हा विभाग आहे. देशाच्या विकासाला साथ देणारा हा विभाग आहे. मी सिंधुदुर्गवासीयांना सांगतो, तुम्हाला मला साथ द्यायची असेल, तर उद्योजक व्हा.'

नारायण राणे यांनी मंत्री अनिल परब यांच्यावरही टीका केली. अनिल परब स्वत:ला राष्ट्रपती, पंतप्रधान समजत होते. दम देत होते. अटक करा म्हणतो, रथ यात्रा जाऊ देणार नाही म्हणतो. पण, कुठेतरी दिसले का माणसं? फूशारकी मारत होते, पद मिळत असल्यामुळे बोलावं लागतं, पण काही झालं नाही. उत्तम उदाहरण म्हणजे इथला खासदार त्याच्या विषयी बोलून मला तोंड खराब करायचं नाही. मी देशाचा जबाबदार मंत्री आहे, मला कामं आहेत. सगळ्या योजना लोकांमध्ये मला न्यायच्या आहेत. औद्योगिक क्रांती मला करायची आहे. काही लोक मला विचलित करून पाहतायत, मी तस होऊ देणार नाही, असं राणे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT