Devendra Fadnavis  esakal
महाराष्ट्र बातम्या

सत्ताबदलानंतर पहिल्यांदाच भाजपनेते संघस्थानी

सत्ताबदलानंतर पहिल्यांदाच भाजपनेते आरएसएसच्या बैठकीला उपस्थिती लावली आहे.

धनश्री ओतारी

सत्ताबदलानंतर पहिल्यांदाच भाजपनेते आरएसएसच्या बैठकीला उपस्थिती लावली आहे. सकाळी ११ च्या सुमारास सुरू झालेल्या या बैठकीत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील प्रामुख्याने सहभागी झाले आहेत. संघातर्फे नियमितपणे विविध संघटनांची समन्वय बैठक आयोजित करण्यात येते.(BJP leaders and Deputy Chief Minister Devendra Fadnavis meeting with RSS in Nagpur )

भाजपचे वरिष्ठ नेते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृतिमंदिर परिसरात ही बैठक आयोजीत करण्यात आली होती. सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांच्या उपस्थितीत ही बैठक सुरू आहे.

त्यात संघटनांनी केलेल्या कामांचा आढावा घेण्यात येतो व पुढील योजनांबाबत चर्चा होते. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर प्रथमच होणाऱ्या या बैठकीला महत्त्व आले आहेत. विविध संघटनांचे पदाधिकारी यावेळी सरकारकडून असलेल्या अपेक्षादेखील व्यक्त करतील.

दोनदिवसांपूर्वीच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरएसएसच्या विचारांवरून भाजपवर हल्लाबोल केला होता. आम्ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन भाजपसोबत युती केली होती. भाजपचा पितृपक्ष असलेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एक विचार आहे, पण त्या संघाचाच विचार भाजप मानत नाही. संघाची विचारसरणी भाजपला मान्य आहे का? त्याप्रमाणे वागत आहेत का? असे सवाल ठाकरेंनी यावेळी भाजपला उपस्थित केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हार्दिक पांड्या २४ तासांत ‘अनफिट’; IND vs AFG वनडे मालिकेपूर्वी बंगळुरूत नेमकं काय घडलं? Inside Story

Pune Bengaluru Highway : पुणे-बंगळूर हायवेने प्रवास करताना सावधान! प्रत्येक 5 किलोमीटरवर बसवले स्मार्ट कॅमेरे; नियम मोडल्यास होणार थेट कारवाई

Latest Marathi News Live Update : होर्मुझमध्ये अमेरिकेचा जहाजावर हल्ला, ३ भारतीयांचा मृत्यू

8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगापूर्वीच सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर ! DA मध्ये होणार दोनदा वाढ, जाणून घ्या अपडेट

Ladki Bahin Yojana May Installment : लाडक्या बहिणींसाठी मे महिन्याच्या हप्त्याची तारीख ठरली; शासन निर्णय जारी

SCROLL FOR NEXT