Manoj Jarange Patil|Maratha Aarakshan|Antarwali Sarati Esakal
महाराष्ट्र बातम्या

Manoj Jarange Patil : आम्हाला तुमचा अभिमान, पण...; भाजप आमदाराने मनोज जरांगेंबद्दल बोलून दाखवली भावना

BJP MLA Prasad Lad says proud of Manoj Jarange Patil : मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती.

रोहित कणसे

राज्यात मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. यादरम्यान मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. आता या टीकेला भाजपकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. भाजपचे नेते आमदार प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

प्रसाद लाड यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ते मनोज जरांगे पाटील यांच्या फडणवीसांवरील टीकेला उत्तर देतान दिसत आहेत.मराठा आरक्षण या विषयावरून ज्या पद्धतीने जरांगे पाटील साहेब देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेऊन द्वेष करत आहेत. मला असं वाटतंय की जरांगे पाटील साहेबांना डीडी नावाचा रोग झाला आहे. हा डीड नावाचा रोग त्यांनी पसरवून टाकला आहे. देवेंद्र द्वेष हा फक्त करायचा पण राज्याच्या ६० वर्षात जे होऊ शकलं नाही ते २०१७-१८ साली आरक्षण दिलं. शिक्षण पद्धतीत बदल केला. मुलं परदेशात शिकायला जावी, यासाठी प्रयत्न केला. मराठ्यांच्या मुलांना नोकऱ्या मिळण्यासाठी प्रयत्न केले. असे अनेक उपक्रम केले. मात्र, मनोज जरांगे कोणाच्या छताखालून द्वेष करत आहेत. हा संशोधनाचा विषय आहे.

पिल्लावळ चुकीची माहिती देतायत

काल दरेकरांच्या बोलण्यावर त्यांनी आवाहन केलं की, दरेकरांनी अंतरवली सराटी मध्ये यावं, मला त्यांच्या मतदारसंघातून साडेतीनशे फोन आले...जरांगे पाटील साहेब खरंतर तुमच्या आजूबाजूची पिल्लावळ आहेत ते चुकीची माहिती देत आहेत. कारण दरेकर हे विधानसभेचे आमदारच नाहीयेत ते विधानपरिषदेचे आमदार आहेत आणि ते भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळं आम्ही आपलं आव्हान स्वीकारायला तयार आहोत पण चर्चेला तुम्ही देखील तयार आहात का? की ज्याच्या छत्रीखाली येऊन तुम्ही फक्त द्वेषच करणार आहात. एकदा होऊन जाऊ द्या 'दूध का दूध और पानी का पानी', असेही प्रसाद लाड यावेळी म्हणाले.

आम्हाला तुमचा अभिमान, पण...

आम्ही देखील ज्या समाजाचे तुम्ही नेतृत्व करत आहात त्याच समाजातून येतो, आम्हाला तुमचा अभिमान आहे. पण ज्या पद्धतीने एका व्यक्तीला टार्गेट करून राजकारण केलं जातंय. जर राजकारणच करायचं असेल तर राजकारणात यावं आणि राजकारणाचं उत्तर राजकारणाने द्यावे. जर समाजासाठी लढायचं असेल तर चर्चेतून मार्ग काढायला हवा. आम्ही ३०० च पाडणार, आम्ही २८८ उभे करणार हे करू नये. आम्ही चर्चेला तयार आहोत, तुम्ही देखील चर्चेला तयार व्हा असेही लाड या व्हिडीओत म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Iran war : युद्ध पुन्हा भडकले ! शस्त्रसंधी सुरु असतानाच अमेरिकेचा हल्ला, इराणचाही प्रतिहल्ला; कुवेत ठरलं रणांगण

Viral Video: RCB च्या विजयानंतर विराट-अनुष्काचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून चाहते झाले वेडे!

ओबीसी आरक्षणावर गदा, ग्रामपंचायतीच्या रणधुमाळीआधी राज्य निवडणूक आयोगाचे नवे आदेश

Accident News: मराठा आंदोलनातून परतताना काळाचा घाला; सरडेवाडीतील एकाचा मृत्यू, दोघे जखमी

Latest Marathi News Update : 'शिवाजी कोण होता?' पुस्तकाच्या बनावट प्रति बाजारात

SCROLL FOR NEXT