Rajendra Patni Passed Away Esakal
महाराष्ट्र बातम्या

Rajendra Patni Passed Away: भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांचं दीर्घ आजाराने निधन; वयाच्या ५९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Rajendra Patni Passed Away: राजेंद्र पाटणी हे कारंजा विधानसभा मतदारसंघातून ते आमदार होते.

अंकिता खाणे (Ankita Khane)

वाशिम जिल्ह्यातील कारंजा विधानसभा मतदारसंघाचे भाजपा आमदार राजेंद्र पाटणी यांचे दीर्घ आजारामुळे आज निधन झालं. ५९ वर्षीय राजेंद्र पाटणी हे गेल्या दोन-तीन वर्षांपासून आजारी असल्याची माहिती मिळत आहे. मुंबईमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज त्यांची प्राणज्योत मालवली. पाटणी यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला आहे. (Rajendra Patni Passed Away)

सकाळी आमदार राजेंद्र पाटणी यांचे मुंबई येथे उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या दोनही किडण्या फेल झाल्या होत्या. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून ते आजाराने त्रस्त होते. ते आधी आधी शिवसेनेत होते. त्यांची भाजपमध्ये सेंकड टर्म होती.

आमदार राजेंद्र पाटणी यांच्या निधनानंतर भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोस्ट लिहून श्रध्दांजली अर्पण केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांची पोस्ट

"अत्यंत दुःखद बातमी: विधानसभेतील माझे सहकारी राजेंद्र पाटणीजी यांचे आज निधन झाले. गेल्या काही महिन्यांपासून ते आजाराशी झुंज देत होते. ते या संकटातून बाहेर पडतील, अशी आम्हा सर्वांना आशा होती. पण आज त्यांची प्राणज्योत मालवली. ग्रामीण प्रश्नांची जाण असलेला लोकप्रतिनिधी भाजपाने गमावला आहे. पश्चिम विदर्भातील प्रश्न सोडविण्यासाठी त्यांचा कायम पुढाकार असायचा. सिंचनाचे प्रश्न मार्गी लागले पाहिजे, म्हणून ते सतत आग्रही असायचे. त्यांचे निधन ही माझी वैयक्तिक हानी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या दुःखद प्रसंगी त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. हे दुःख सहन करण्याची शक्ती कुटुंबीयांना मिळावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. ॐ शांती"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Municipal Corporation Protest: जंतर-मंतर आंदोलनाचे महापालिकेत पडसाद; सत्ताधारी-विरोधकांमध्ये घोषणाबाजी

Harmony Park: संगीताच्या सुरांमध्ये योगा आणि खेळ, ५० रुपयांच्या तिकिटात स्वप्नवत सफर! ३०० टन भंगारातून साकारल्या कलाकृती

Latest Marathi News Live Update : लोकसभेचे कामकाज सोमवारपर्यंत तहकूब, विरोधकांकडून केंद्रीय शिक्षणमंत्री प्रधान यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी

सुबोध भावेने साकारली गोंदवलेकर महाराजांची भूमिका, अभिनेत्याबद्दल अनुभव सांगताना अर्थव सुदामे म्हणाला... 'त्यांनी पैसे...'

NEET ते TET... 2024 मध्येच कायदा आला, तरी पेपरफुटी थांबली नाही; सरकारकडे उत्तर आहे का? नवीन कायदा कशासाठी? Fact Explained...

SCROLL FOR NEXT