bjp pravin darekar on cm eknath shinde in last row of niti ayog meeting rohit pawar share photo  Sakal
महाराष्ट्र बातम्या

CM तिसऱ्या रांगेत, राष्ट्रवादीच्या टीकेला भाजपचं प्रत्युत्तर; म्हटलं स्वाभिमानाच्या...

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : आज दिल्ली येथे पार पडलेल्या निती आयोगाची बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधानांकडे १८ हजार कोटींच्या विकास कामाचे प्रस्ताव पाठवले आहेत. या बैठकी दरम्यान मुख्यमंत्र्यांना तिसऱ्या रांगेत उभे केल्यावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. त्यावरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी टीका करत नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान यामुद्द्यावर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

दरेकर म्हणाले की, काही अपमान करण्याचा उद्देश नाहीये, आता यांना मराठी माणसांचं पडलं आहे, आताप्रर्यंत कॉंग्रेस दिल्लीच्या तख्तापुढं पाणी भरायचं तेव्हा कुठं गेला होता यांचा स्वाभिमान. उद्या नीती आयोगाच्या माध्यमातून महाराष्ट्राला शिंदे आणि फडणवीस यांच्या माध्यमातून विकास निधी येईल, तेव्हा त्यांना कळेल महाराष्ट्र आणि मराठी माणसाचं हितं कसं सांभाळलं जातं. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून करण्यात आलेल्या टीकेला उत्तर देताना दरेकर म्हणाले की, ही लोकं वैफल्याने ग्रासलेली आहेत, सत्ता गेल्याने त्याना आमच्यावर टीका करण्यापलीकडे दुसरं काही पडलेलं. मुंबई-महाराष्ट्राचं हीत जपण्यासाठी आम्ही सक्षम आहोत असे दरेकरांनी सांगितलं.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्रबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाबद्दल विचारले असता दरेकर म्हणाले की, राज्यपालांच्या त्या वक्तव्याचे कुणीही समर्थन केले नाही, त्यांचं वयक्तीक मत असल्याचे सांगितले आहे, कोणीही त्यांचं समर्थन केलेलं नाहीये. राज्यपालांनी पदावर असताना त्यांनी मुंबई, महाराष्ट्र आणि मराठी माणसांची माफी मागीतली आहे. नीती आयोगाच्या बैठकीत कितव्या रांगेत आहेत याची चिंता करू नका, जेव्हा नीती आयोगातून, केंद्रातून जास्तीचा निधी आणू त्यावेळी जनतेला कळेल, यांचं महाराष्ट्रावरील प्रेम हे पुतणा मावशीचं असल्याचे दरेकर यावेळी म्हणाले आहेत.

रोहित पवार काय म्हणालेत..

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शेवटच्या रांगेत उभं केल्यावरून रोहित पवार यांनी ट्वीट केलं आहे की, एकनाथ शिंदे साहेब मोठे नेते आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचं इंजिन असलेल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. तरीही त्यांना शेवटच्या रांगेत स्थान देणं योग्य नाही. प्रत्येक मराठी मनाला यामुळं नक्कीच दुःख झालंय. यापुढं असं होणार नाही याची दक्षता केंद्र सरकार घेईल, अशी अपेक्षा करूयात!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi Update : वंचित बहुजन आघाडीचे युवा प्रमुख सुजात आंबेडकर यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

Student Protest: भीतीपेक्षा मोठा होता विद्यार्थ्यांचा आवाज! घरच्यांना न सांगता जंतरमंतरवर पोहोचली नम्रता; आंदोलनात झाली सहभागी

Mumbai Rain: मुंबईकरांची जीवनवाहिनी कोलमडली! विरार-डहाणू लोकलसेवा पूर्णतः बंद; प्रवाशांचे हाल

Raj and Uddhav Thackeray: "मोदींना विद्यार्थ्यांशी बोलायला कमीपणा वाटतो का?"; राज-उद्धवांचा सरकारवर घणाघात, 26 जुलैला मुंबईत मोर्चा

MSEDCL Officer Arrested : 2 हजारांची लाच महावितरण अधिकाऱ्याला पडली महाग! ACB ची भुसावळमध्ये धाड; अतिरिक्त कार्यकारी अभियंता अटकेत

SCROLL FOR NEXT