बूस्टर डोसचा निर्णय देशपातळीवर व्हावा esakal
महाराष्ट्र बातम्या

हरियाणा, दिल्लीत बूस्टर डोस मोफत; महाराष्ट्रात कधी?

कोविशिल्ड लस ओमिक्रॉन व्हेरियंटविरोधात लढण्यात कुमकुवत झाली आहे.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : राजधीनी दिल्लीमध्ये वाढणारी कोरोना रूग्णांची (Corona Cases In India) संख्या लक्षात घेता दिल्ली (Delhi) सरकारने कोरोनाचा नागरिकांसाठी बूस्टर डोस (Booster Dose) मोफत देण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर आता हरियाणामध्येही 18 ते 59 वयोगटातील नागरिकांना बूस्टर डोस मोफत दिला जाणार आहे. त्यासाठी 300 कोटी रुपयांचा खर्च राज्य सरकार उचलणार आहे. दरम्यान, महाराष्ट्रातदेखील संभव्य कोरोनाच्या चौथ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर कधीपासून लसीचा मोफत डोस दिला जाणार, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. (Corona Booster Dose News)

बूस्टर डोससाठी मोजावे लागतायेत पैसे

केंद्राकडून 18 ते 59 वर्षे असलेल्या नागरिकांना ज्यांना कोरोना लसीचा दूसरा डोस घेऊन नऊ महिने पूर्ण झाले आहेत, अशा नागरिकांना बूस्टर डोस घेता येत आहे. मात्र, पात्र नागरिकांसाठी हा डोस केवळ खासगी रूग्णालयांमध्ये उपलब्ध असून, यासाठी नागरिकांना साधारण 375 रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे अनेक पात्र नागरिक कोरोना लसीचा बूस्टर डोस घेण्याकडे कानडोळा करत असल्याचे चित्र दिसत आहे.

बुस्टर डोस आवश्यक - NIV

कोरोना विषाणूविरोधात लशींच्या प्रभावाबाबत झालेल्या एका अभ्यासातून हे समोर आलंय की, कोविशिल्ड लस ओमिक्रॉन व्हेरियंटविरोधात लढण्यात कुमकुवत झाली आहे. बरे झालेले रुग्ण आणि दोन डोस घेतलेल्या व्यक्ती यांच्या तुलनेतून हे समोर आलं आहे. त्यामुळं कोरोनाचा प्रभाव थोपवण्यासाठी बुस्टर डोस आवश्यक आहे, असं नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीनं (NIV) म्हटलं आहे. ICMR च्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीच्या (ICMR-NIV) तज्ज्ञांनी कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लशींबाबत संशोधन केलं आहे. यामुळं लोक पात्र झाल्यानंतर बुस्टर डोस लवकरात लवकर घेण्यात यावा अशी शिफारसही या संस्थेनं केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar: अखेर वेळ ठरली! नितीश कुमार राजीनामा देणार; तारीख आली समोर, बिहारमध्ये २० वर्षांनंतर बदलाची चाहूल

IPL 2020 Point Table : विदर्भच्या पोट्ट्याने राजस्थानची 'वाट' लावली! Praful Hingeने इतिहास घडवताना हैदराबादला मिळवून दिला दणदणीत विजय, गुणतालिकेत बदल

Pune Accident: पुण्यात थरारक घटना! मद्यपी चालकाने तरुणाला फरफटत नेऊन चिरडले; हडपसर-सासवड रस्त्यावरील घटना, चालकाला अटक!

Mohol Crime: छळातून दुर्दैवी अंत; मोहोळमध्ये नवविवाहितेचा खून, नवरा व सासूला चार दिवसांची कोठडी!

तापमान ४२ अंशावर! ‘ही’ फळे खावा, नैसर्गिक पेये, आंबिल प्या; लहान मुलांची 'अशी' घ्या काळजी, वाचा...

SCROLL FOR NEXT