Lockdown esakal
महाराष्ट्र बातम्या

राज्यात लॉकडाऊन 1 जूनपर्यंत वाढवला; नवी नियमावली जारी

सूरज यादव

मुंबई - राज्यातील (Maharashtra) कोरोनाच्या (Corona) वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर ब्रेक द चेन (Break The Chain) अंतर्गत असलेले निर्बंध 1 जूनपर्यंत वाढवण्यात आले आहेत. राज्य सरकारने (Maharashtra Government) यासंदर्भातील नियमावलीही जारी केली आहे. परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांसाठी आरटी पीसीआर चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. याबाबतचा आदेश जारी करण्यात आला आहे. बुधवारी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी माहिती दिली होती. मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये काही निर्बंध वाढवण्यात आले आहेत. 15 मे रोजी सकाळी सात वाजल्यापासून ते 1 जून सकाळा 7 वाजेपर्यंत हे नवे निर्बंध लागू राहणार आहेत.

ब्रेक द चेनच्या नव्या नियमावलीनुसार राज्यात प्रवेश करण्यासाठी आरटीपीसीआर टेस्ट रिपोर्ट निगेटिव्ह असणं बंधनकारक आहे. तसंच तो रिपोर्ट 48 तास आधीचा असायला हवा. संवेदनशील भागातील कडक निर्बंध हे जुन्या आदेशानुसार असणार आहे. कारमधून दोन पेक्षा जास्त लोकांना प्रवास करता येणार नाही.

लॉकडाऊनच्या या काळात दुध व्यवसाय करणाऱ्यांना तसंच घरपोच सेवा देणाऱ्यांसाठी सूट देण्यात आली आहे. परराज्यातून माल वाहतूक करणाऱ्या गाड्यांमध्ये फक्त दोनच जणांना प्रवास करता येईल. त्यांना आरटीपीसीआर टेस्ट करावीच लागणार आहे. दुकानांसह इतर व्यवसायांसाठी वेळही देण्यात आली आहे.

किराणा मालाची दुकाने, दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्री, भाजीपाला विक्री, फळे विक्री, अंडी,मटण, चिकन,मासे विक्री, कृषी संबंधित सर्व सेवा / दुकाने, पशूखाद्य विक्री, बेकरी, मिठाई दुकाने, सर्व प्रकारची खाद्य पदार्थ दुकाने, पाळीव प्राण्यांची खाद्य दुकाने, येणाऱ्या पावसाळ्याशी संबंधित वस्तूंची दुकाने ही सकाळी 7 ते 11 या वेळेत सुरु राहणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT