Buldhana Bus Accident  
महाराष्ट्र बातम्या

"आम्ही खाली उडी मारताच...", समृद्धीवरील अपघातातून बचावलेल्या प्रवाशाने सांगितलं क्षणात काय घडलं?

Sandip Kapde

Buldhana Bus Accident : बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा शहराजवळ झालेल्या भीषण बस अपघातात २५ प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला. समृद्धी एक्स्प्रेस वेवर हा अपघात झाला. येथे विदर्भ ट्रॅव्हल्सची लक्झरी बस नागपूरहून पुण्याकडे  जात होती. अपघातानंतर बसने पेट घेतला. काही वेळातच बसला आग लागली. लोकांना काही समजेपर्यंत २५ जणांना आपला जीव गमवावा लागला होता.

बसमध्ये एकूण ३३ लोक होते, त्यापैकी ३ निष्पाप मुलांसह २५ जणांचा मृत्यू झाला. त्याचवेळी ८ जण गंभीर जखमी झाले. समृद्धी द्रुतगती मार्गावर जाणाऱ्या बसचा टायर फुटला, त्यानंतर ती खांबाला आणि दुभाजकाला धडकली. यानंतर तो वळला असता आग लागली, अशी माहिती मिळत आहेत.

दरम्यान हा अपघात कसा झाला हे अपघातातून बचावलेल्या प्रत्यक्षदर्शींने सांगितले आहे. बुलढाणा बस अपघातातून बचावलेले योगेश रामदास गवई म्हणाले, "मी नागपूरहून औरंगाबादसाठी विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसमध्ये चढलो. समृद्धी महामार्ग एक्स्प्रेस वेवर अपघात झाल्यानंतर बस पलटी होऊन लगेचच पेटली. 3-4 जण खिडकी तोडून पळून गेले, काही वेळातच बसमध्ये स्फोट झाला"

गवई म्हणाला, यावेळी मी एका मुलाल वर खेचले. तो वाचला. आम्ही खाली उडी मारताच ट्रॅव्हल्सचा स्फोट झाला. यावेळी आम्ही तेथून दूर पळालो.

बसची खिडकी तोडून काही प्रवासी बाहेर आले

अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीने सांगितले की, "माझ्या शेजारी बसलेला प्रवासी आणि मी मागील खिडकी तोडून बाहेर आलो. बसची खिडकी तोडून चार ते पाच प्रवासी बाहेर आले, मात्र इतर प्रवाशांना बाहेर पडता आले नाही. एका स्थानिक नागरिकाने सांगितले. "अपघातानंतर लोकांनी महामार्गावरील इतर वाहनांची मदत मागितली. मात्र कोणीही थांबले नाही."

मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत

बुलढाणा बस दुर्घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. मृत व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबियांप्रती शोक व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री मदत निधीतून प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्र्यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hormuz Blockade: ट्रम्प यांचा यू-टर्न; जगाचं टेंन्शन वाढलं, आता अमेरिकेची 'होर्मुझ'वर आजपासून नाकेबंदी

Akola News: मनुष्यबळाअभावी ‘पीसीपीएनडीटी’ सेल ढेपाळला; प्रमुख पद रिक्त, डेटा एन्ट्री ऑपरेटर नाही; समुपदेशक झाले ‘कारकून’

Latest Marathi News Live Update : 'गोकुळ'मधील गैरव्यवहाराची ‘ईडी’कडून चौकशी करा, आमदार शिवाजी पाटील यांची मागणी

आशा भोसलेंनी एकही शब्द न गायलेले ४ मिनिटांचं गाणं, ऑफरनंतर झालेल्या नाराज पण...

Akola News: उद्दिष्ट १३० कोटींचे वसुली मात्र १०१ कोटी; गौणखनिज वसुलीत खनिकर्म विभागाची कामगिरी; गौणखनिज वसुलीत खनिकर्म विभागाची कामगिरी

SCROLL FOR NEXT