महाराष्ट्र बातम्या

MSRTC ST : एसटीची बंपर कमाई! दिवाळीच्या सिझनमध्ये ३२८ कोटींचं मिळवलं उत्पन्न

उत्पन्नात पुणे विभाग पहिल्या क्रमांकावर

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : ग्रामीण भागाची लालपरी असलेल्या एसटी दिवाळीत सुसाट धावल्याने एसटी महामंडळाच्या तिजोरीत मोठी भर पडली आहे. गेल्या पंधरा दिवसात ३२८ कोटी ४० लाख रुपयांचा महसूल एसटी महामंडळाला मिळाला आहे.

तर २१ कोटी ४४ लाख रुपये उत्पन्न मिळवून पुणे विभाग पहिल्या क्रमांकावर आहे. तर एसटी महामंडळाने भाऊबीजेच्या दिवशी ३१ कोटी ६० लाखांची विक्रमी कमाई केली आहे.

तिजोरीत मोठी भर

दिवाळीची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन एसटी महामंडळ दरवर्षी नियमित एसटी बसेसशिवाय अतिरिक्त एसटी बसेस चालविण्याचे नियोजन केले होते. यंदाही एसटी महामंडळाकडून राज्यभरात अतिरिक्त बस गाड्या चालविण्यात आल्याने एसटी महामंडळाच्या तिजोरीत मोठी भर पडली आहे.

पुणे विभाग अव्वल

दिवाळीच्या हंगाम्यात म्हणजे गेल्या १५ दिवसात एसटी महामंडळाने ३२८ कोटी ४० लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे. या कालावधीत पुणे विभागाने सर्वाधिक प्रवासी वाहतूक केली आहे. २१ कोटी ४४ लाख रुपये उत्पन्न घेत पुणे विभाग पहिल्या क्रमांकावर आहे. तर जळगाव विभागाने १७ कोटी ४१ लाख रुपयांचा महसुल गोळा केला आहे.

भाऊबीजदिनी ३१ कोटी पेक्षा जास्त कमाई

शुक्रवारी, १२ नोव्हेंबर रोजी धनत्रयोदशीच्या दिवशी एसटी महामंडळाला तब्बल २७ कोटी ६२१ लाखांचा महसूल मिळाला होता. तर बुधवारी भाऊबीज मोठ्या आनंदात, उत्साहात साजरी करण्यात आली. या दिवशी महामंडळाने राज्यभरात तब्बल १४ हजार ६७७ एसटी चालविल्या. त्यातून महामंडळाला तब्बल ३१ कोटी ६० लाखांचे विक्रमी उत्पन्न महामंडळाला मिळाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local Train : मुंबईकरांसाठी खुशखबर! मध्य रेल्वेवर १५ डब्यांच्या लोकलच्या आणखी १० फेऱ्या, १२ डब्यांच्या लोकलचे १५ डब्यांत रूपांतर

FDA Crime : पुणे शहरातील प्रसिद्ध गोल्‍डन बेकरीसह दहा बेकरी, रेस्टॉरंटचे परवाने निलंबित; अस्वच्छतेप्रकरणी एफडीएची कारवाई

Garfield Sobers: क्रिकेटच्या इतिहासातील महान ऑलराउंडर काळाच्या पडद्याआड! गॅरी सोबर्स यांचं निधन; क्रीडाजगत शोकसागरात

Pune News : जप्त गुळाचे करायचे काय? गूळ उत्पादकांचा सवाल, जवळपास ४०० गुऱ्हाळांवर परिणाम

Amritsar Express: अमृतसर एक्स्प्रेसच्या डब्याखाली सापडला मानवी पाय; सीएसएमटी रेल्वे यार्डमधील घटना, रेल्वे पोलिसांना वेगळाच संशय

SCROLL FOR NEXT