case registered against shivsena chandrakant khaire for objectionable statements on CM Eknath Shinde  
महाराष्ट्र बातम्या

Shivsena: ठाकरेंचा दावा खरा! शिंदे गटाकडून थेट शिवसेनेच्या माजी खासदारावरच गुन्हा

सकाळ डिजिटल टीम

सातारा: एकनाथ शिंदे यांच्यविरोधात केलेलं वक्तव्य शिवसेनेचे नेत चंद्रकांत खैरे यांना चांगलच भोवलं आहे, मुख्यमंत्री शिंदे याच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी चंद्रकांत खैरे यांच्याविरोधात सातारा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही वेळापूर्वी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांवर दाबाव आणण्याकारिता गुन्हे दाखल केले जात असल्याचा दावा केल्यानंतर खैरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सत्ता संघर्षात आता शिंदे गटाकडून आक्रमक भूमिका घेतली जात असून मुख्यमंत्र्याविरोधात आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल सातारा पोलिस ठाण्यात खैरेंविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खैरे यांनी वेळोवेळा शिंदे याच्यावर अत्यंत तिखट शब्दात टीका केली होती, दरम्यान एकनाथ शिंदे यांचे डावपेच बऱ्याच दिवसांपासून चालले होते. आनंद दिघे असते तर त्यांना उलटं टांगलं असतं. ते गेल्यानंतर यांच्यात काय काय सुटलं हे राजन विचारे यांना किंवा तेथील शिवसैनिकांना विचारा असं खैरे म्हणाले होते, त्यांच्या या विधानानंतर हा गुन्हा दाखल झाला आहे. शिंदे गटाचे राजेंद्र जंजाळ यांच्या तक्ररीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान निवडणूक आयोगाने शिवेसना नाव आणि पक्षचिन्ह गोठवल्यानंतर फेसबुकच्या माध्यमातून बोलतांना उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेला पर्यायी नावं आणि चिन्हंदेखील दाखवून दिले. त्रिशुळ, उगवता सूर्य आणि धगधगती मशाल या चिन्हांचे फोटो उद्धव ठाकरेंनी दाखवले. शिवाय नावांमध्ये शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही पर्यायी नावं निवडणूक आयोगाला दिल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

मी डगमगणारा नाही, लढणारा आहे. असं म्हणत अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीमध्ये ताकदीने लढणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. त्यांनी निवडणूक आयोगाला आवाहन करत आमचं नाव आणि चिन्हं आम्हाला तातडीने द्या, असं सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संविधानात बसेल ते मिळेल, कुणाच्या ताटातलं देणार नाही; मराठा आरक्षणावर फडणवीसांची प्रतिक्रिया, जरांगे म्हणाले, ताटच उरणार नाही

सभ्य रहा, नीट कपडे परिधान करा! भाडेकरू मुलींना घरमालकाचा सल्ला, रूममध्ये लावला CCTV कॅमेरा

Marathi News Live Updates : सरकारने आवश्यक ते निर्णय घेतलेत, शिष्टमंडळ जरांगेंकडे जाणार नाही : विखे-पाटील

Pithori Amavasya 2026: १० की ११ सप्टेंबर? पिठोरी अमावस्या नक्की कधी? जाणून घ्या तिथी, पूजेची पद्धत अन् महत्त्व!

Sainik Takli MIDC protest : सैनिक टाकळी एमआयडीसीविरोधात शिरोळमध्ये राडा; प्रशासनाच्या कार्यालयाचे गेट तोडले, काचा फोडल्या, पोलिस कर्मचारी जखमी

SCROLL FOR NEXT