Hail Sakal
महाराष्ट्र बातम्या

मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारा पडण्याची शक्यता

मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट तर कोकणात काही ठिकाणी लक्षणीय वाढ झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट तर कोकणात काही ठिकाणी लक्षणीय वाढ झाली आहे.

पुणे - राज्यात मंगळवारी (ता. ८) कोकणासह (Kokan) मध्य महाराष्ट्रात (Maharashtra) तुरळक ठिकाणी पाऊस (Rain) पडला. दरम्यान बुधवारी (ता. ९) मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यातील (Marathwada) तुरळक भागात विजांच्या कडकडाटासह गारा (Hail) पडण्याचा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.

मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट तर कोकणात काही ठिकाणी लक्षणीय वाढ झाली आहे. राज्यातील बहुतांश ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ३३ ते ३७ अंशाच्या दरम्यान नोंदला जात आहे. तसेच ढगाळ वातावरणामुळे कमाल तापमानात चढ-उतार कायम आहे. मंगळवारी राज्यातील सर्वाधिक कमाल तापमान सोलापूर येथे ३७ अंश सेल्सिअस तर, नीचांकी तापमानाची नोंद मालेगाव येथे १६.४ अंश सेल्सीअस इतकी झाली. धुळे, नाशिक, जळगाव जिल्ह्यांत वीजा, मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली असून, तुरळक ठिकाणी गारपिटीने तडाखा दिला आहे.

पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे कोकणापासून चक्राकार वाऱ्यांपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. हा पट्टा आणि अरबी समुद्रावरून वाहणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे महाराष्ट्र, गुजरातमध्ये पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव तर मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना जिल्ह्यात गारपीट होण्याचा इशारा देण्यात आला आहे. पुढील तीन दिवस राज्यातील तुरळक भागात पावसाची शक्यता आहे, मात्र गुरुवारपासून (ता. १०) विदर्भात हवामान कोरडे राहणार असल्याचे हवामानशास्त्र विभागाने नमूद केले आहे.

शहर आणि परिसरातही पावसाच्या हलक्या सरींची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मंगळवारी शहरात १८.३ अंश सेल्सिअस इतक्या किमान तर ३४.३ कमाल तापमानाची नोंद झाली. शहरात मंगळवारी दुपारनंतर ढगाळ वातावरण पाहायला मिळाले. तसेच सायंकाळनंतर औंध, बाणेर, सांगवीसह उपनगरांमध्ये पावसाने हजेरी लावली. गेल्या तीन ते चार दिवसांपासून दिवसभर ऊन सावलीचा खेळ कायम आहे. पुढील चार दिवस शहर आणि परिसरात ही स्थिती अशीच कायम राहणार असून मेघगर्जनेसह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तर अंशतः ढगाळ वातावरण आणि त्यामुळे किमान तापमानात होणारी वाढ यामुळे पुणेकरांना उकाडा अधिक जाणवणार आहे. किमान तापमान हे २० ते २४ अंशांवर पोचू शकते.

बुधवारी (ता. ९) येथे पावसाची शक्यता

  • कोकण : पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.

  • मध्य महाराष्ट्र : नगर, पुणे, सातारा, कोल्हापूर.

  • मराठवाडा : बीड, परभणी, हिंगोली, नांदेड

  • विदर्भ : बुलडाणा, अमरावती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi Mahapuja : '20 वर्षे एकही वारी चुकवली नाही...'; मुख्यमंत्री फडणवीसांसोबत शासकीय महापूजेचा कोणाला मिळाला मान? धाराशिवमधील शेतकरी दाम्पत्य आहे तरी कोण?

Pandharpur Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न; धाराशिवच्या शेतकरी दाम्पत्याला मिळाला 'मानाचा वारकरी' होण्याचा बहुमान

Pandharpur Ashadhi Ekadashi Live Updates : "पांडुरंगा, सर्वांना सुखी ठेव, चांगला पाऊस पडू दे..."; CM फडणवीसांसोबत महापूजा केल्यानंतर मानाच्या वारकऱ्याचे विठुरायाला साकडे

Pandharpur Ashadhi Wari : पंढरपुरात वैष्णवांचा मेळा! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पहाटे पार पडणार शासकीय महापूजा, 20 लाख भाविक दाखल

PM Modi Instagram Video : 'थँक्यू फ्रेंड्स!' नीट पेपरफुटीच्या वादावर पंतप्रधान मोदींचा तरुणांना मध्यरात्री नवा मेसेज; Instagram वर व्हिडिओ पोस्ट करत काय म्हणाले पीएम?

SCROLL FOR NEXT