Chandrakant Khaire son Audio clip of goes viral money for government transfers during mva govt  
महाराष्ट्र बातम्या

Shivsena : बदलीसाठी पैसे घेतल्याचा आरोप; चंद्रकांत खैरेंच्या मुलाची ऑडिओ क्लिप व्हायरल

सकाळ डिजिटल टीम

ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांच्या मुलाची ऑडिओ क्लिप वाह्यरल झाली आहे. अधिकाऱ्यांच्या बदल्यासाठी पैसे घेतल्याचा आरोप केला जात आहे. अधिकाऱ्याच्या बदलीचे काम न झाल्याने दोन लाख रुपये परत मागण्यात आले आहेत. दरम्यान हा सगळा प्रकार महाविकास आघाडी सरकारच्या काळातील असल्याचे सांगण्यात येत आहे.

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांचे चिरंजीव ऋषीकेश खैरे यांच्याकडे पैसे मागत असल्याची ही कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. ऋषीकेश हे युवासेनेचे जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी आहेत.

राज्यात मविआ सरकार असताना एका अधिकाऱ्याची वन विभागात बदली करून देण्यासाठी चंद्रकांत खैरे यांचे पुत्र ऋषीकेश खैरे यांनी एका व्यक्तीकडून २ लाख रुपये घेतल्याचा उल्लेख या ऑडिओ क्लिपमध्ये आहे. यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या ऑडिओमध्ये सदरील व्यक्ती ऋषीकेश यांच्याकडे दोन वर्ष झाली बदलीचे कामही झाले नाही आणि माझे पैसेही परत मिळाले नाही असे सांगत आहे.

सदरील व्यक्ती मी घरातील सोनं-चांदी विकून दोन लाख रुपये दिले होते, तुम्ही कामही केले नाही आणि पैसेही देत नाही, त्यामुळे मी खूप अडचणीत आहे. तुम्ही मला हलक्यात घेत आहात, आता एकच तारीख सांगा आणि माझे पैसे परत द्या, अशी मागणी सदर करत आहे. तर त्या व्यक्तीला डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात शंभर टक्के पैसे देवून टाकतो, असे खैरे सांगत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT