महाराष्ट्र बातम्या

Chhagan Bhujbal : ''मी गावात जाणार, गावबंदी कराल तर शिक्षा होईल'', पाहणी दौऱ्यावर भुजबळांची प्रतिक्रिया

संतोष कानडे

मुंबईः अवकाळी पावसामुळे नाशिकध्ये मोठ्या प्रमाणावर शेतीचं नुकसान झालेलं आहे. या नुकासीची पाहाणी करण्यासाठी छगन भुजबळांचा गुरुवारी दौरा होत आहे. मात्र या दौऱ्याला गावांमधून त्यांना विरोध होतोय. यासंदर्भातील एक ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे.

ऑडिओ क्लिपमध्ये एक मराठा बांधव भुजबळांना गावात न येण्याचं आवाहन करताना ऐकू येत आहे. त्यावर भुजबळ म्हणतात, तुम्ही चार लोक म्हणजे गाव नाही. मी येणार आणि ज्यांना मला भेटायचं आहे त्यांना मी भेटणार. त्यानंतर भुजबळांनी पाहाणी दौरा करणार असल्याचं स्पष्ट केलंय.

गावांमधून होणाऱ्या विरोधानंतर मंत्री छगन भुजबळ यांची प्रतिक्रियादेखील आलीय. त्यात ते म्हणतात, ९९ टक्के मराठा माझ्याबरोबर आहेत. एखादा मेसेज येतो आणि गावात येऊ नको म्हणतो.. परंतु मी जाणार. ज्यांना मला भेटाचंय ते भेटतील ज्यांना भेटायचं नाही ते भेटणार नाहीत.

भुजबळ पुढे म्हणाले, मला कुणीही गावबंदी करु शकणार नाही. तसं कुणी केलं तर त्याला एक महिन्याची शिक्षा होऊ शकते. कुणी काहीही मेसेज फिरवले तरी मी नुकसानग्रस्त भागाचा दौरा करणार आहे. असं म्हणत त्यांनी दौऱ्यावर ठाम असल्याचं स्पष्ट केलं आहे. भुजबळ यांच्या संपर्क कार्यालयाबाहेर पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT