Politics esakal
महाराष्ट्र बातम्या

'ईडीने एकदा नोटीस काय बजावली तर इंजिननं यु-टर्नच घेतला'

'ईडीने एकदा काय नोटीस बजावली तर इंजिनने लगेच यू-टर्न घेतला, कोहिनूर टॉवर लगेच हालायला लागला'

सकाळ डिजिटल टीम

'ईडीने एकदा काय नोटीस बजावली तर इंजिनने लगेच यू-टर्न घेतला, कोहिनूर टॉवर लगेच हालायला लागला'

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी काल मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्यात महाविकास आघाडी आणि शरद पवार यांच्यावर टीका केली. यात त्यांनी केलेल्या आरोपांमुळे आता महाविकास आघाडी आणि मनसे यांच्यात टोलेबाजी सुरु आहे. दरम्यान, राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिकिया येत आहेत. राज ठाकरे यांचा गुडीपाडवा मेळावा होता की भाजपचा मेळावा होता हे काही कळायला मार्ग नाही. ईडीने एकदा काय नोटीस बजावली तर इंजिनने लगेच यू-टर्न घेतला, कोहिनूर टॉवर लगेच हालायला लागला' असा टोला राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (chagan bhujbal) यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंना लगावला आहे.

राज ठाकरे यांनी या भाषणात भुजबळ यांच्यावर टीका केली होती. दोन वर्ष जेलमध्ये राहून आलेल्या छगन भुजबळ यांना मंत्रिपद दिले ते काय स्वातंत्र्य सेनांनी होते का? असा सवाल राज ठाकरे यांनी केला होता. आज नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत असताना भुजबळ यांनी राज यांना जशास तसे उत्तर दिले. ते म्हणाले, या आधी राज ठाकरेंनी भाजपाचा कडवा विरोध केला होता पण काल त्यांनी अचानक टर्न घेतला. असं वाटत होतं की, ही भाजपची सभा आहे. त्यांनी माझ्यावरही टीका केली. मला मंत्रिपद मिळाले वगैरे, पण मी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करतच होतो, असा ट्रॅक कधी बदलला नाही त्यामुळे मला राष्ट्रवादीने बक्षीस म्हणून शपथविधीला पहिले पाचारण केले, असा पलटवार भुजबळांनी केला आहे.

राज ठाकरे यांच्या मशिदीच्या भोंगा बंद करण्याबाबतच्या वक्तव्यावर ते म्हणाले, देशात मशिदीच्या भोंग्याबाबत भाजपला कायदा करायला सांगा, महाराष्ट्रातही त्यांनी सरकार असताना केले नाही. निवडणुका आल्याने धर्मवाद वाढवून लोकांना गोळा करण्याचे काम सुरू आहे. काल त्यांच्या स्टेजवर फक्त भाजपचे झेंडे नव्हते. मुंबईत ते भाजपसोबत येऊ शकतात. फक्त भाजप त्यांना घेते की नाही हे बघावे लागेल, असंही भुजबळ म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT