Chhagan Bhujbal Esakal
महाराष्ट्र बातम्या

Chhagan Bhujbal: 'एकनाथ शिंदे ८ महिने काय पुढे पण ते मुख्यमंत्री राहु शकतील...', शिंदेच्या 'त्या' वक्तव्यावर भुजबळांची प्रतिक्रिया

Chhagan Bhujbal: मुख्यमंत्री शिंदेंनी आमदार अपात्र निर्णयापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांची मुख्यमंत्री पदाविषयी मोठं वक्तव्य केलं, त्यांच्या या वक्तव्यावर आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

मुख्यमंत्री शिंदेंनी आमदार अपात्र निर्णयापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांची मुख्यमंत्री पदाविषयी मोठं वक्तव्य केलं. मी अजून ८ महिने आहे म्हणून आपल्याला फिरावं लागणार असल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं. त्यांच्या या वक्तव्यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. याबाबत बोलताना राष्ट्रवादी(अजित पवार गट) नेते आणि मंत्री छगन भुजबळ म्हणाले, 'ते जर म्हणत असतील तर ते राहतील, ८ महिने काय पुढे पण राहू शकतात'.

राज्यात तीन पक्षांचं सरकार आहे. आगामी निवडणुकीनंतर सर्व पक्षांचे सर्वश्रेष्ठ नेते एकत्रित बसून याबाबतचा निर्णय घेतील, असं त्यांनी पुढं म्हटलं आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मी अजून 8 महिने मुख्यमंत्री असल्याचे वक्तव्य केले. आपल्याला खूप कामे करायची असून बरेच फिरायचे असल्याचे त्यांनी म्हटले. शिवसेना आमदार अपात्रतेची कारवाईची टागंती तलवार असतानाही त्यांनी हे वक्तव्य केल्याने चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

महाराष्ट्रात जातीनिहाय जनगणना करा - छगन भुजबळ

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. तर २० जानेवारीला मनोज जरांगे यांच्यासह मराठा समाज मुंबईत आंदोलन करणार आहेत. तर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी ओबीसी समाजाने विरोध केला आहे, दरम्यान महाराष्ट्रात जातीनिहाय जनगणना करा. १५ दिवसांत सर्व्हेक्षण होऊ शकतं तर जातीनिहाय जनगणनाही करा, असे छगन भुजबळ म्हणाले आहेत.

तर मनोज जरांगे यांच्या मागण्या वाढतच चालल्या आहेत असंही भुजबळ पुढे म्हणालेत.मराठा आरक्षणाला वेगळं आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही, तर त्यांनी ओबीसीमधून आरक्षण देण्यास आमचा विरोध आहे. हळू हळू मागण्या वाढत चालल्या आहेत, संपूर्ण मराठ्यांना ओबीसी आरक्षण द्या असं त्यांचं म्हणणं आहे. नवनिर्मित नेत्यांच्या मागण्या वाढत चालल्या आहेत असा टोला त्यांनी यावेळी लगावला आहे.

जितेंद्र आव्हाडांच्या श्री रामावरील वक्तव्यावर काय म्हणाले भुजबळ?

अति शहाणा त्याचा बैल रिकामा म्हण मी ऐकली आहे. पवार साहेबांचा जो उरला सुरला गट आहे तो संपवण्यासाठी दुसऱ्या कुठल्या पक्षाला काही करायची गरज नाही, असा टोला त्यांनी यावेळी लगावला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs DC Live: विराट कोहली अपयशी ठरला, वैभव सूर्यवंशीचा 'पॉवर'फुल विक्रम थोडक्यात वाचला! १५ वर्षीय फलंदाज वरचढ ठरला

Inflation Rise: IMD चा कमी पावसाचा इशारा! शेती संकटात? महागाई वाढणार का?

Latest Marathi News Live Update: ठाण्यातील टेंभी नाका आनंद आश्रम येथे शिवसेना जाहीर निषेध आंदोलन

बिग बॉस मराठीच्या घरात गायक अभिजीत सावंतची ENTRY ! घरातील स्पर्धकांना केलं गाण्याने मंत्रमुग्ध ..

Supreme Court : ४२ वर्षांनंतर ताजमहल केस नंबर १३३८१ संपली! १९८४ दाखल झालेल्या या याचिकेत नेमकं काय होतं? खरं कारण माहिती आहे का?

SCROLL FOR NEXT