महाराष्ट्र बातम्या

Chhagan Bhujbal : अंजली दमानिया यांच्या आरोपांना छगन भुजबळांचं उत्तर; म्हणाले ओबीसी...

संतोष कानडे

मुंबईः सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी शनिवारी छगन भुजबळ यांच्यावर गंभीर आरोप केले होते. भुजबळांनी बेकायदेशीररित्या घर बळकावल्याचं सांगत त्यांनी मूळ घराचे कुटुंबिय सोबत आणले होते. सुरुवातीला भुजबळांच्या घरासमोर त्यांना बोलू दिलं नव्हतं. नंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन भुजबळांवर आक्षेप घेतले.

अंजली दमानिया यांच्या आरोपांना मंत्री छगन भुजबळ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, अंजली दमानिया यांच्याबद्दल मी अधिक काही बोलणार नाही. सुपारी घेऊन बोलणाऱ्या लोकांबद्दल मी काय बोलणार? आम्ही कुणाचंही घर लाटलेलं नाही. या प्रकरणाची केस कोर्टामध्ये सुरु असून जो निकाल येईल, तो आम्हाला मान्य असेल.

भुजबळ पुढे म्हणाले की, घरासंबंधीचे कागदपत्र आमच्याकडे आहेत. परंतु मी या कंपनीचा डायरेक्टर नाही. आमचे लोक आहेत. हे सगळं असलं तरी दमानिया यांना असं नाटक करायचं आजच कसं सुचलं? एकीकडे ओबीसींचा लढा सुरु असताना दुसरीकडे असे आरोप केले जात आहेत. काहीही झालं तरी न्यायाच्या पलीकडे मी अजिबात जाणार नाही.

दरम्यान, छगन भुजबळ यांनी जालन्याच्या अंबडमध्ये घेतलेल्या सभेची खूपच चर्चा झाली. त्यांच्या आक्रमक भाषणामुळे राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, त्यामुळे त्यांच्याकडून मंत्रिपद काढू घ्या, अशीही मागणी जोर धरु लागली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Katraj Accident : कात्रज-कोंढवा रस्त्यावर भीषण अपघात; विद्यार्थिनीचा मृत्यू

गणेशोत्सवात चाकरमान्यांचा कोकणचा प्रवास सुकर! सीएसएमटी-सावंतवाडी रेल्वे सुरु, 'अशी' करा सीट बुक

Strawberry Cultivation : आंबेगाव, खेड, जुन्नर व मावळ तालुक्यातील आदिवासी शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरी लागवडीसाठी ४.९६ कोटी रुपये निधी मंजूर; विधानसभा माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील

Marathi News Live Updates : मिरवणूक बंदीकडे चाललेली पावले थांबली नाहीत तर भविष्यात उत्सवच बंद होतील - साऊंड असोसिएशन

Maratha Reservation: जरांगेंचं उपोषण सुरु असताना नाशिकमध्ये मराठा समन्वयकांची पत्रकार परिषद; SEBC आरक्षणावर ठाम!

SCROLL FOR NEXT