Narendra Modi esakal
महाराष्ट्र बातम्या

Shivendraraje Bhosale : राजकारणासाठी 'हे' करणं चुकीचं; भाजप आणि PM मोदींनी नेहमीच छत्रपतींचा सन्मान केलाय!

कोणी कितीही प्रयत्न केला, तरी छत्रपतींना कमी लेखण्याचा डाव यशस्वी होऊ देणार नाही.

सकाळ डिजिटल टीम

भाजप आणि मोदींकडून छत्रपतींचा मानसन्मान ठेवण्याचे सातत्याने काम केले जात आहे. राज्यातही छत्रपतींसोबत सर्व महापुरुषांचा सन्मान ठेवला जात आहे.

शिर्डी : मंत्रिपदाचा निर्णय पक्ष आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) घेतील. देवेंद्रजी योग्य वेळी योग्य निर्णय घेतील याची खात्री आहे, असा विश्वास आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendraraje Bhosale) यांनी व्यक्त केला.

शिर्डीत साईंच्या दर्शनासाठी ते आले होते. त्या वेळी त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. दरम्यान, भाजप आणि मोदींकडून छत्रपतींचा मानसन्मान ठेवण्याचे सातत्याने काम केले जात आहे. राज्यातही छत्रपतींसोबत सर्व महापुरुषांचा सन्मान ठेवला जात आहे.

दुर्दैवाने महाराष्ट्रात औरंगजेबाचे उदातीकरण केले जात आहे, अशी खंत त्यांनी या वेळी व्यक्त केली. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ‘‘मी नेहमीच साईबाबांच्या दर्शनाला येत असतो. सर्वांवर आशीर्वाद राहू द्या अशी साईंच्या चरणी प्रार्थना केली. कुटुंबीयांसाठीही प्रार्थना केली. समृद्धीच्या अपघातावरून राजकारण करणे योग्य नाही, असेही शिवेंद्रराजे यांनी नमूद केले.

ते म्हणाले, फक्त रस्त्याला दोष देऊन चालणार नाही, तर अपघातांची चौकशी देखील झाली पाहिजे, तसेच शासनाने योग्य त्या उपाययोजना राबवाव्यात. झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. ज्या कुटुंबावर संकट कोसळले त्यांच्या दुःखाचा आपण अंदाजही लावू शकत नाही. त्या कुटुंबांना दुःखातून बाहेर पडण्याची ताकद मिळो.’’

भाजप आणि मोदींकडून छत्रपतींचा मानसन्मान ठेवण्याचे सातत्याने काम केले जात आहे. राज्यातही छत्रपतींसोबत सर्व महापुरुषांचा सन्मान ठेवला जात आहे. दुर्दैवाने महाराष्ट्रात औरंगजेबाचे उदातीकरण केले जात आहे. राजकारणासाठी हे करणे चुकीचे आहे.

मुस्लिम बांधवही औरंगजेब आपल्या हिताचा होता असे मानत नाहीत. महाराष्ट्राची ओळख छत्रपतींमुळेच राहणार असून, कोणी कितीही प्रयत्न केला, तरी छत्रपतींना कमी लेखण्याचा डाव यशस्वी होऊ देणार नाही, असा इशारा शिवेंद्रसिंहराजेंनी दिला. यावेळी त्यांनी प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमवर देखील टीका केली.

उदयनराजेंना आव्हान

सातारा बाजार समिती वादावर ते म्हणाले, ‘‘सातारा मार्केट कमिटीच्या बाबतीत सर्वांनी कायदेशीर माहिती घेतली पाहिजे. आमची बाजू योग्य असल्याने कोर्टाचा निर्णयही आमच्या बाजूने आहे. डेव्हलपमेंटसाठी मार्केट उभं करायला चाललोय. त्यात आमचा वैयक्तिक फायदा नाही. विकासाला कुणी आडवा येत असेल तर संघर्ष होणारच.’’ ज्यांचा प्रकल्पाला विरोध असेल, त्यांनी कोर्टात जावं, असे आव्हान त्यांनी खासदार उदयनराजे भोसले यांचे नाव न घेता दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Silver Price Today: सोन्याच्या भावात 5 दिवसांत मोठी घसरण! उच्चांकापासून तब्बल 33 हजारांनी स्वस्त; दसऱ्याआधी पाहा ताजा भाव

Distance Education: राज्यात दूरस्थ शिक्षण घेणारे वाढले ;केंद्रीय उच्चशिक्षण विभागाचा अहवाल

Train Viral Video : वा रे पठ्ठ्या ! थेट ट्रेनच्या एसी डब्यातच थाटले पानाचे दुकान, अनोखा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

स्मृती मानधनाचा कर्णधार म्हणून आज पहिला सामना! दुसरीकडे भारताच्या स्टार महिला क्रिकेटपटूची अचानक निवृत्ती...

Marathi News Live Updates: तिरंगा फडकवण्याच्या आवाहनानंतर दिल्लीतील टॉलस्टॉय मार्ग परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त

SCROLL FOR NEXT