Chhatrapati Shivaji Maharaj Statue esakal
महाराष्ट्र बातम्या

Chhatrapati Shivaji Maharaj Statue : भारत-पाकिस्तान सीमेवर शिवरायांचा पुतळा; मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते होणार अनावरण

‘आम्ही पुणेकर’ या संस्थेच्या पुढाकाराने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कुपवाडा येथे आला आहे.

सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

मुंबई - काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील भारत-पाकिस्तान सीमेजवळच्या ४१ राष्ट्रीय रायफल (मराठा एलआय) येथे  बसविण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ  पुतळ्याचे लोकार्पण मंगळवारी (ता.७) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री जवानांसोबत दिवाळी फराळाचा आनंदही घेणार आहेत.

‘आम्ही पुणेकर’ या संस्थेच्या पुढाकाराने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कुपवाडा येथे आला आहे. उद्या सकाळी दहाच्या सुमारास या पुतळ्याचे लोकार्पण एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी जम्मू -काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार आदी प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत.

पाकिस्तानच्या दिशेने

पुतळ्याच्या समोर असलेल्या पर्वंतरांगांच्या पलिकडे पाकिस्तान आहे. अश्वारूढ पुतळ्यावरील शिवाजी महाराजांचे मुख आणि तलवार पाकिस्तानच्या दिशेने असावे, अशापद्धतीने पुतळा बसविण्यात आला आहे. त्यासाठी सुमारे एक हजार ८०० ट्रक माती टाकून भराव करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

England Coach : इंग्लंड कसोटी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची ऑफर, अँडी फ्लॉवर RCB ची साथ सोडणार? मोठी अपडेट्स आली समोर

Satana News : 'एक रुपयात पीक विमा योजना' तात्काळ पूर्ववत सुरू करा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे संजय चव्हाण यांची आग्रही मागणी

Latest Marathi News Live Update : मी ठाकरेंना अमरावतीला येऊन एकत्र हनुमान चालीसा पठण करण्याचे निमंत्रण देते - नवनीत राणा

'प्रायव्हेट जेट' ऐकलं असेल पण संपूर्ण रेल्वे ट्रेन बुक करता येते! भारतीय रेल्वेची खास 'FTR' सुविधा...

Kasari Sonarmala Road: कासारीतील सोनारमळा रस्ता वर्षानुवर्षे दुरावस्थेत; ग्रामस्थांचा ‘रस्ता देता का’ असा आक्रोश

SCROLL FOR NEXT