MVA Morcha Uddhav Thackera Devendra Fadnavis  esakal
महाराष्ट्र बातम्या

MVA Morcha : उद्याच्या मोर्चात छोटा राजनचा भाऊ होणार सहभागी; कारणही सांगितलं...

सकाळ डिजिटल टीम

मुंबईः महाविकास आघाडीचा उद्या महामोर्चा होत आहे. महापुरुषांचा अवमान, सीमावाद आणि इतर मुद्दे घेऊन हा मोर्चा निघणार आहे. परंतु या मोर्चामध्ये छोटा राजनचा भाऊ सहभागी होणार आहे. त्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल औरंगाबाद येथे केलेल्या वादग्रस्त विधानानंतर राज्यभरात संताप व्यक्त होत आहे. याशिवाय महाराष्ट्र-कर्नाटकचा मुद्दा तापलेला आहे. हेच मुद्दे घेऊन महाविकास आघाडीचा उद्या महामोर्चा निघत आहे.

हेही वाचाः काय आहे सलाम किंवा कुर्निसाताचे महत्त्व राजशिष्टाचारांमध्ये

मागील काही दिवसांपासून भाजपशी संबंधित मंडळींकडून महापुरुषांबद्दल वादग्रस्त विधानं समोर आलेली आहेत. त्यातच महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाचा मुद्दा पेटलेला आहे. यावरुन राज्य सरकार आणि भाजपच्या भूमिकेबद्दल विरोधकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

त्यातच आता कुख्यात गुंड छोटा राजनचा भाऊ दीपक निकाळजे हे या मोर्चात सहभागी होणार आहेत. आरपीआयच्या निकाळजे गटाने या मोर्चाला पाठिंबा दिला आहे. निकाळजे म्हणाले की, महापुरुषांबद्दल चुकीचं वक्तव्यं होत आहेत. परंतु संविधानामध्ये ताकद आहे, हे दिसेलच. त्यामुळे या मोर्चामध्ये सहभागी व्हा, असं आवाहन दीपक निकाळजे यांनी केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! दसऱ्यानंतर मुंबईत महत्त्वाची बैठक; पगारवाढ आणि DAबाबत काय चर्चा होणार?

VIDEO: दुष्काळाच्या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री गैरहजर; महायुतीत नाराजीनाट्याची चर्चा

Masur Fox Attack: मसूरमध्ये कोल्ह्यांची दहशत! वृद्धासह चिमुकली, महिला आणि शेतकऱ्यावर हल्ले

Latest Marathi News Live Update : कोल्हापुरात अंबाबाई मंदिरात पुजाऱ्यांचं आंदोलन सुरु; देवस्थान समितीविरोधात पुजारी आक्रमक

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या ट्रकला आग

SCROLL FOR NEXT