cm eknath shinde esakal
महाराष्ट्र बातम्या

Eknath Shinde: 'त्या' दिवशी फडणवीसांच्या ड्रायव्हिंगला मुख्यमंत्री घाबरले होते; मोदींनीही केली चौकशी

संतोष कानडे

मुंबईः समृद्धी महामार्गाच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेले होते. त्या दिवशी त्यांनी एकाच गाडीतून प्रवास केला. मात्र यावेळी एकनाथ शिंदे सुरुवातीला खरच घाबरले होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, यापूर्वी जेव्हा मी समृद्धी महामार्गाच्या पाहणीसाठी गेलो होतो तेव्हा मीच गाडी चालवली. मात्र यावेळी देवेंद्रजींनी गाडी चालवण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांची ड्रायव्हिंग मला माहिती नव्हती म्हणून सुरुवातीला जरा धाकधूक झाली.

यासंदर्भात खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही चौकशी केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. 'कैसा रहा सफर' अशी विचारणा मोदींनी केल्याचं त्यांनी सांगितलं. 'एबीपी माझा'च्या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते.

नागपूर येथून समृद्धी महामार्गास प्रारंभ होत असून तेथून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी 4 डिसेंबर रोजी पाहणी दौरा केला. वर्धा जिल्ह्यात समृद्धीचा 55 किलोमीटरचा मार्ग असून या मार्गाची पाहणी करण्यात आली. यावेळी एकाच वाहनात मुख्यमंत्री आणी उपमुख्यमंत्री होते. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः वाहन चालवित मुख्यमंत्री शिंदे यांचे सारथी बनले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karnataka CM Resigns : कर्नाटकच्या राजकारणात भूकंप! सिद्धरामय्या यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा; DK शिवकुमार होणार नवे CM, काँग्रेस हायकमांडचा मोठा निर्णय

प्राजक्ता माळीने कान्सच्या रेड कार्पेटवर नेसलेली साडी कुठली आहे ठाऊक आहे? ठाण्यासोबत आहे खास कनेक्शन

वैभव सूर्यवंशी म्हणजे भारतीय क्रिकेट नाही! १५ वर्षीय खेळाडूला टीम इंडियात संधी देण्याच्या विरोधात उभा राहिला दिग्गज, म्हणाला...

अनुराग कश्यप यांच्या ‘बंदर’चं नवीन गाणं रिलीज; बॉबी देओलची भूमिका चर्चेत

Sinhgad Palace History : सिंहगडावरचा भव्यदिव्य राजवाडा कोणी विकला? थक्क करणारा इतिहास अन् दुर्मिळ फोटो पाहा

SCROLL FOR NEXT