bhagat singh koshyari sakal media
महाराष्ट्र बातम्या

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आज राज्यपालांची घेणार भेट

कार्तिक पुजारी (Kartik Pujarai)

मुंबई- राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. बारा आमदारांच्या यादीबाबत ही भेट होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. 8 महिने उलटून गेलेत, तरीही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आमदारांच्या यादीवर काहीही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे यावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी विनंती करण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते राज्यपालांची भेट घेणार असल्याचं समजते. (Maharashtra Latest News)

विधानपरिषदेतील 12 आमदारांच्या यादीबाबत गेल्या 8 महिन्यांपासून विषय प्रलंबित आहे. मुंबई हायकोर्टाने याप्रकरणी सुनावणी करत राज्यपालांना तातडीने आमदारांच्या यादीबाबत निर्णय घेण्याचा सल्ला दिला होता. पण, अजूनही राज्यपालांनी यावर काही हालचाल दाखवलेली नाही. त्यामुळे ठाकरे सरकारमधील नेते कोश्यारी यांची आज भेट घेतील. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कॅबिनेट बैठक बोलावली आहे. बैठकीत याविषयी पुढील रणनीती आखली जाणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि थोरात राज्यपालांच्या भेटीला जाणार आहेत. राज्यापालांनी यावर लवकर निर्णय घ्यावा अशी विनंती ते करणार आहेत.

भाजप नेते तक्रारी घेऊन राज्यपालांकडे जात असतात. नुकतेच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेप्रकरणी विनोद तावडे यांनी राज्यपालांची भेट घेतली होती. त्यानंतर आता महाविकास आघाडीचे नेतेही राज्यपालांची भेट घेत आहेत. त्यामुळे या भेटीत नारायण राणे यांच्याविषयीही चर्चा होण्याची शक्यता आहे. दुपारी बारानंतर ही भेट होणार आहे. त्यामुळे या भेटीकडे राज्याचे लक्ष असणार आहे.

12 आमदारांच्या यादीप्रकरणी कोर्ट काय म्हणालं होतं?

संविधानानं दिलेल्या अधिकारांनुसार राज्यपाल कुणालाही उत्तर देण्यास बांधिल नाहीत. त्यामुळे कोर्ट त्यांना निर्देश देऊ शकत नाही. पण, राज्यपालांनी जबाबदारीचं भान ठेवत तातडीने 12 आमदारांच्या जागांवर निर्णय घ्यावा. अनिश्चित काळासाठी संविधानिक जागा रिकाम्या ठेवता येणार नाहीत, असं कोर्टाने म्हटलं होतं. मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्यात समन्वय असायला हवा. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना याबाबत उत्तर द्यावं, असंही कोर्टाने म्हटलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT