महाराष्ट्र बातम्या

राज्याच्या मुख्य सचिवपदी देबाशिष चक्रवर्ती; सीताराम कुंटे मुख्य सल्लागार

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे (Sitaram Kunte) यांचा कार्यकाळ आज 30 नोव्हेंबरला संपला आहे. त्यामुळे आता राज्याचे मुख्य सचिव असलेली जबाबदारी देबाशिष चक्रवर्ती (Debashish Chakraborty) यांच्याकडेच सोपवण्यात आली आहे. देबाशिष चक्रवर्ती यांच्याकडे नियोजन विभागाचा कार्यभार आहे. त्यांच्याकडेच अतिरिक्त कार्यभार म्हणून ही नवी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. देबाशिष चक्रवर्ती हे १९८६ बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.

त्यामुळे मुख्य सचिव पदावरून निवृत्त झालेले सीताराम कुंटे यांचा प्रशासनातील प्रदीर्घ अनुभव लक्षात घेता त्यांची नियुक्ती मुख्यमंत्री सचिवालयात प्रधान सल्लागार या पदावर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भातील निर्देश आज दिले.

राज्याचे मुख्य सचिव म्हणून सीताराम कुंटे यांची तीन महिन्यांनी मुदतवाढ करण्यात यावी असा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पाठवला होता. मात्र, सीताराम कुंटे यांच्या या मुदतवाढीचा प्रस्ताव अजूनही केंद्र सरकारने मंजूर केलेला नाहीये. त्यामुळे, देबाशिष चक्रवर्ती यांच्याकडे हा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.

याबाबत बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय की, मावळते मुख्य सचिव सिताराम कुंटे यांचा मुदतवाढीचा प्रस्ताव केंद्राने का नाकारला हे तपासून पाहावं लागेल. कारण यापूर्वीच्या मुख्य सचिवांना दोनदा मुदतवाढ मिळाली होती. मुख्यमंत्र्यांशी बोलूनच याबाबत अधिकचं भाष्य करेन, असं त्यांनी म्हटलंय.

सरकारकडून कुंटेंच्या मुदतवाढीचा प्रस्ताव

सीताराम कुंटे हे 1985 च्या महाराष्ट्र बॅचचे अधिकारी आहेत. सीताराम कुंटे यांनी राज्यात आणि मुंबईत कोरोनाच्या संकटामध्ये चांगली कामगिरी बजावली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विश्वासू अधिकाऱ्यांपैकी एक असे सीताराम कुंटे यांची ओळख आहे. त्यांचा कार्यकाळ आज म्हणजेच 30 नोव्हेंबरला संपला आहे. त्यामुळे सीताराम कुंटे यांना राज्याचे मुख्य सचिव म्हणून आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्राकडे पाठवला होता. पण सीताराम कुंटे यांच्या मुदतवाढीचा प्रस्ताव अद्याप केंद्र सरकारने मंजूर केला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुणे हादरलं! तरुणावर ८ जणांचा गोळीबार, जीव वाचवण्यासाठी पाण्यात मारली उडी; घटनेनं खळबळ

IND vs ENG 3rd ODI: वॉशिंग्टन सुंदर OUT, रोहित शर्मावर सस्पेन्स कायम! तिसऱ्या वन डेत कशी असेल टीम इंडियाची Playing XI?

Latest Marathi News Live Update : जंतर मंतरवरील आंदोलनात गोंधळ, अभिजीत दीपकेंवर शाईफेक

भारताच्या अंतराळ क्षेत्रात नवा इतिहास! देशातील पहिलं खाजगी ऑर्बिटल रॉकेट 'Vikram-1' लाँच

Credit Card Rule: क्रेडिट कार्डवर किती खर्च करावा? पगाराच्या ‘या’ टक्क्यांपेक्षा जास्त खर्च पडू शकतो महागात; पाहा नियम

SCROLL FOR NEXT