चित्रा वाघ टिम ई सकाळ
महाराष्ट्र बातम्या

पेन ड्राईव्हच्या अस्त्रामुळे ठाकरे सरकारचा 'खेळ खल्लास'- चित्रा वाघ

'संजय राऊत आणि राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री तुरूंगात जायला तयार'

सकाळ डिजिटल टीम

'संजय राऊत आणि राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री तुरूंगात जायला तयार'

राज्याच्या राजकारणात सातत्याने विविध घटना घडत आहेत. यामुळे मागील काही दिवसांपासून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अजूनही सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोपप्रत्यारोप पहायला मिळत आहेत. दरम्यान, आता पुन्हा एकदा भाजपच्या चित्रा वाघ यांनी ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. ट्विट करत त्यांनी खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे.

वाघ म्हणतात, ठाकरे सरकारच्या धुरीणांना काय झालं आहे. सर्वज्ञानी संजय राऊत आणि राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री तुरूंगात जायला तयार आहेत. याशिवाय किशोरी पेडणेकर तर मला फाशी द्या, असे म्हणत आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पेन ड्राईव्हच्या अस्त्रामुळे 'खेळ खल्लास' ही भावना एकुणच बळावलेली दिसत आहे, असा चिमटा त्यांनी काढला आहे.

दरम्यान, सध्या राज्यात अधिवेशन सुरु आहे. यात सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकाला चांगलंच धारेवर धरलं आहे. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांचे अनेक घोटाळे बाहेर काढल्याने वाद निर्माण झाले आहेत. या टीकेनंतर सत्ताधारी गटातील नेतेही भाजपा नेत्यांवर तुटुन पडले आहेत. यामुळे सातत्याने एकमेकांवर आरोप करण्याचे सत्र सुरुच आहे. याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही सडेतोड प्रतित्युर दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana September Installment : लाडक्या बहिणींचा सप्टेंबरचा हप्ता कधी येणार? दिवाळीपूर्वी खात्यात 3,000 रुपये जमा होणार का? जाणून घ्या मोठी अपडेट

IND vs WI 5th T20I : भारत-वेस्ट इंडिज यांच्यातला पाचवा सामना होणार रद्द? चिंता वाढवणारे अपडेट्स, मालिका बरोबरीत सुटणार?

अजब प्रेमाची गजब कहाणी! प्रसिद्ध ३० वर्षीय इन्फ्लुएन्सर लग्नबंधनात अडकणार, थेट ७५ वर्षीय व्यक्तीसोबत साखरपुडा पार

Navratri Day Six: आज नवरात्रीची सहावी माळ! देवी कात्यायनीची पूजा कशी करावी? जाणून घ्या मंत्र, नैवेद्य आणि पौराणिक कथा

Supreme Court: सुनावणी सुरु असताना CJI सूर्यकांत यांच्यासमोरच न्यायालयात राडा! वकिलाचा मायक्रोफोन हिसकावला, चालू प्रकरणातून वकिलाची माघार

SCROLL FOR NEXT