Solapur ZP Esakal
महाराष्ट्र बातम्या

लिपिकांना लेखी परीक्षा द्यावीच लागणार! ‘सीईओ’ निर्णयावर ठाम; जिल्हा परिषदेकडून प्रशिक्षण देण्याची तयारी; जानेवारीत परीक्षेची शक्यता

पंचायत समित्यांसह जिल्हा परिषदेतील प्रत्येक विभागामध्ये काम करणाऱ्या लिपिकांची लेखी परीक्षा घेण्याचा निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी घेतला आहे. हा निर्णय अनेकांच्या जिव्हारी लागला असून परीक्षा पुढे ढकलावी, घेऊ नये अशी विनंती करीत आहेत.

तात्या लांडगे

सोलापूर : पंचायत समित्यांसह जिल्हा परिषदेतील प्रत्येक विभागामध्ये काम करणाऱ्या लिपिकांची लेखी परीक्षा घेण्याचा निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी घेतला आहे. हा निर्णय अनेकांच्या जिव्हारी लागला असून परीक्षा पुढे ढकलावी, घेऊ नये अशी विनंती करीत आहेत. मात्र, अभ्यास व प्रशिक्षणासाठी वेळ घ्या, पण परीक्षा होणारच यावर मुख्य कार्यकारी अधिकारी ठाम आहेत.

जिल्हा परिषदेसह पंचायत समित्यांमधील लिपिकांची संख्या मोठी असून वरिष्ठ अधिकाऱ्यांचे निर्णय, कामकाज त्यांनाच पाहावे लागते. मात्र, अनेकांना लिपिकांची नेमकी जबाबदारी काय, त्यांना कोणत्या प्रकारची प्रशासकीय माहिती आवश्यक आहे, टायपिंग, संगणक हाताळता येते का, याची माहिती नाही तथा कमी माहिती आहे.

अनेक विभागांच्या पत्रव्यवहारावरून ही बाब मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या लक्षात आली. त्यानंतर त्यांनी प्रशासन गतिमान व्हावे, कर्मचाऱ्यांचीही प्रशासकीय कार्यक्षमता वाढावी, कामातील गुणवत्ता वाढावी या हेतूने परीक्षेचा पर्याय अवलंबण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, पहिल्यांदा लेखी परीक्षा झाल्यानंतर काही दिवसांनी त्या लिपिकांची टायपिंग व संगणक हाताळणीची देखील परीक्षा घेतली जाऊ शकते.

तत्पूर्वी, कोणाच्या तरी वरदहस्ताने एकाच टेबलावर ठाण मांडून असलेल्यांची क्षमता व गुणवत्ता या परीक्षेच्या निकालातून समोर येईल. त्यानंतर कोणाला कोणत्या विभागात नेमणूक द्यायची याचा निर्णय होईल, अशीही चर्चा आहे.

दोन महिने वेळ घ्या, पण निर्णय मागे नाहीच

लिपिकांची लेखी परीक्षा दिवाळीपूर्वी घेण्याचे नियोजित होते. मात्र, काही कारणास्तव त्याचे नियोजन लांबणीवर पडले. आता लेखी परीक्षेला प्रश्न कशाप्रकारचे असावेत, वस्तुनिष्ठ प्रश्न व वर्णनात्मक प्रश्न किती असावेत, याचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. तत्पूर्वी, कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या विनंतीनुसार लिपिकांना प्रशिक्षण देण्याची तयारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची असल्याचे समजते. पण, लिपिकांना त्यांचे कर्तव्य व काम काय, याचा अभ्यास करून परीक्षा द्यावी लागणार आहे. २० डिसेंबरऐवजी जानेवारी २०२४ मध्ये ही परीक्षा घेण्यावर सीईओ ठाम असल्याचे सूत्रांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT