महाराष्ट्र बातम्या

CM Eknath Shinde: 'माझ्यासाठी वाहतूक रोखू नका' म्हणणाऱ्या शिंदेच्या दौऱ्यासाठी 'एसटी'चा मार्गच बदलला

पाचोड सिडको मार्गे वळवण्याच्या निर्णयामुळे प्रवाश्यांचा रस्ता दीड पटीने वाढणार

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्याचे मुख्यमंत्री जिथे जातात तिकडे ट्राफिक जाम करतात असं शिंदे यांच्या दौऱ्यानंतर बोललं गेलं. गणेश उत्सवाच्या काळात ते पुण्यात आले तेव्हा वाहनांच्या रांगा लागल्या. त्यानंतर पुण्यातील चांदणी चौकातही तीच परिस्थिती त्यातच आता मुख्यमंत्री औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. माझ्या ताफ्याला स्पेशल प्रोटोकॉल देऊ नका, लोकांना वाहतुकीत अडवून ठेवू नका, असे निर्देश काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलिसांना दिले होते. प्रत्यक्षात मात्र मुख्यमंत्री औरंगाबाद दौऱ्यावर असतानाच औरंगाबाद ते पैठण मार्गावरील एसटी महामंडळाच्या बसेस बंद करून त्या पाचोड सिडको मार्गे वळवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. बस पाचोड सिडको मार्गे वळवण्याच्या निर्णयामुळे प्रवाश्यांचा रस्ता दीड पटीने वाढणार आहे.

औरंगाबाद येथील पैठण दौऱ्यात रस्त्यावरील एसटीच्या बसेस बंद करण्याच्या निर्णयामुळे सर्वसामान्यांसाठी डोकेदुखी ठरणार आहे. तर एसटी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी याबद्दल नाराजी व्यक्ती केली आहे.

या निर्णयामुळे औरंगाबाद येथील पैठण मार्गावर असणाऱ्या गावातील प्रवाशांना त्रास सहन करावा लागणार आहे. याचा फटका या मार्गावरून अनेक विद्यार्थी सुद्धा एसटी बसने प्रवास करतात. त्यामुळे याचा फटका महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांनाही बसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संविधानात बसेल ते मिळेल, कुणाच्या ताटातलं देणार नाही; मराठा आरक्षणावर फडणवीसांची प्रतिक्रिया, जरांगे म्हणाले, ताटच उरणार नाही

सभ्य रहा, नीट कपडे परिधान करा! भाडेकरू मुलींना घरमालकाचा सल्ला, रूममध्ये लावला CCTV कॅमेरा

Marathi News Live Updates : सरकारने आवश्यक ते निर्णय घेतलेत, शिष्टमंडळ जरांगेंकडे जाणार नाही : विखे-पाटील

Sainik Takli MIDC protest : सैनिक टाकळी एमआयडीसीविरोधात शिरोळमध्ये राडा; प्रशासनाच्या कार्यालयाचे गेट तोडले, काचा फोडल्या, पोलिस कर्मचारी जखमी

Duleep Trophy 2026: हा, मुलगा कमाल आहे! वैभव सूर्यवंशीच्या सांगण्यावरून DRS घेतला अन् सामन्यात ट्विस्ट आला Video Viral

SCROLL FOR NEXT