CM Eknath Shinde News esakal
महाराष्ट्र बातम्या

Eknath Shinde : राम मंदिरासाठी लागणारं सागाचं लाकूड...; रामभक्तांना निरोप देतांना शिंदे काय म्हणाले?

संतोष कानडे

ठाणेः शिवसेनेच्या वतीने अयोध्या दौऱ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आज ठाणे आणि नाशिक येथून एक-एक ट्रेन अयोध्येच्या दिशेने रवाना झाली. उद्या रामभक्त अयोध्येत दाखल होतील.

ठाणे येथे रामभक्तांना निरोप देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रेल्वे स्थानकावर दाखल झाले होते. यावेळी त्यांनी राम मंदिर, बाळासाहेब ठाकरे, नरेंद्र मोदी, काँग्रेस या सगळ्या विषयांवर भाष्य केलं. महत्त्वाचं म्हणजे राम मंदिरासाठी लागणारं सागाचं लाकूड महाराष्ट्रातून जातं, याचा आपल्याचा आनंद आणि अभिमान असल्याचं शिंदे म्हणाले.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर बोलतांना एकनाथ शिंदे म्हणाले की, आमच्यामुळे का होईना पण लोक रामलल्लाचं दर्शन घेण्यासाठी जाणार आहेत, ही मोठी गोष्ट आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे आज अयोध्येत भव्यदिव्य राम मंदिराचं स्वप्न पूर्ण होत आहे. स्व. बाळासाहेब ठाकरे यांनीही राम मंदिराचं स्वप्न बघितलं होतं, ते आज पूर्ण होत आहे. परवा रामभक्तांचं दर्शन होईल, अशी माहिती शिंदेंनी दिली.

काय म्हणाले एकनाथ शिंदे?

  • अयोध्येसाठी एक ट्रेन ठाणे आणि एक ट्रेन नाशिमधून निघाली आहे

  • शिवसैनिक आणि रामभक्त उद्या अयोध्येत पोहोचतील, परवा दर्शन होईल

  • त्यांना आज निरोप द्यायला मी स्वतः आलो आहे

  • अयोध्या हा आमच्यासाठी अतिशय श्रद्धेचा, भक्तीचा, अस्मितेचा विषय आहे

  • रामभक्तांची टीम रवाना झाली आहे

  • आमच्यामुळे का होईना अनेक लोक (काँग्रेस) रामलल्लाचं दर्शन घ्यायला जाणार आहेत

  • नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भव्यदिव्य राममंदिराचं स्वप्न पूर्ण होत आहे

  • राम मंदिर व्हावं, अशी खुद्द बाळासाहेबांची इच्छा होती

  • मंदिरासाठी लागणारं सागाचं लाकूड जात आहे, ते महाराष्ट्रातून जात आहे

  • ही महाराष्ट्राची आनंदाची आणि समाधानाची बाब आहे

  • मुख्यमंत्री आदित्यनाथ यांची मी भेट घेणार आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMCच्या ३१ हजार कोटींच्या ठेवी मोडणार, विकासकामांसाठी वापरणार; भाजपचा महापौर होताच मोठा निर्णय

T20 WC, IND vs ZIM: भारतीय संघाने Playing XI मध्ये काय करावा बदल? पाँटिंग, शास्त्रींनी 'त्या' एका खेळाडूचं नाव घेत स्पष्ट सांगितलं

Latest Marathi News Live Update : पुण्याच्या येरवडा कारागृहात कैद्यांकडे मोबाईल सापडल्याने खळबळ, सिमकार्ड, पॉवर बँक, चार्जर आणि वायर जप्त

Congress vs BJP Political Clash : 'दिवा विझण्याआधी फडफडतो तशी भाजपची सध्याची अवस्था, शेवट जवळ आलाय'; डीके शिवकुमारांची जहरी टीका

Insurance: अपघात झाला तरी खिशाला फटका नाही! Zero Dep Insurance मुळे कसे वाचतील पैसे?

SCROLL FOR NEXT