cm eknath shinde Esakal
महाराष्ट्र बातम्या

Eknath Shinde : "गुवाहाटीला असताना श्री श्री रविशंकर यांचा फोन आला अन्..."; CM शिंदेंनी सांगितला 'तो' अनुभव

दावोसला गेलो तिथेही गुरुदेव भेटले, असंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

गुवाहाटीला गेलो तेव्हा श्री श्री रविशंकर यांनी फोन करुन आपल्याला आशिर्वाद दिला असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज म्हणाले. गुरुदेव चांगलं काम करणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहतात, असंही शिंदे म्हणाले. ते जालन्यात बोलत होते.

जालना जिल्ह्यात सलाम किसान आणि वरद क्रॉप सायन्स यांच्यातर्फे शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. जलतारा - जलसंधारणातून ग्रामसमृद्धीकडे ही या मेळाव्याची संकल्पना होती. त्यानिमित्ताने श्री श्री रविशंकर हेदेखील मुख्यमंत्र्यांसोबत व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी गुवाहाटीचा अनुभव सांगितला आहे.

हेही वाचा - पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. यात आज श्री श्री रविशंकर आलेत. त्यांचे आशिर्वाद तुम्हा सगळ्यांना मिळणार आहेत. आम्ही जेव्हा गुवाहाटीला होतो, तेव्हा श्री श्री रविशंकर यांनी मला फोन करुन आशिर्वाद दिला होता. आम्ही त्यांना सांगितलं की, आम्ही लढाई सुरू केलीय. ते म्हणाले, "तुम्ही चांगलं काम करताय, तुम्हाला यश मिळेल. गुरुदेव चांगलं काम करणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहतात. तो कार्यक्रम त्यावेळी झाला म्हणून आज हा कार्यक्रम होतोय. "

दावोसमध्येही श्री श्री रविशंकर भेटल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. ते म्हणाले,"आम्ही गुंतवणूक आणण्यासाठी दावोसला गेलो होते. तिथेही आम्हाला गुरुदेव भेटले. दावोसमध्ये आम्ही १ लाख ४० हजार कोटींचे करार केले. ते प्रत्यक्षात आम्ही आणूच असा विश्वास त्यांनी त्यावेळी व्यक्त केला. त्यांचं काम मोठं आहे."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: दिल्लीच्या आंदोलनात पुन्हा हिंसा! तरुणांकडून दगडफेक; पोलिसांकडून लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

Devala News : विवाहितेने दोन लहान मुलींसह गावाबाहेरच्या विहिरीत उडी टाकून संपविले जीवन

Sonam Wangchuk: रुग्णालयातून सोनम वांगचुक यांचा पहिला व्हिडिओ, सरकारला दिला 'असा' प्रस्ताव, भावनिक प्रतिक्रिया समोर

Pune Mechanical Parking Demolition: संभाजी उद्यानातील अडीच कोटींचे मेकॅनिकल पार्किंग जमीनदोस्त; महापालिकेचा लोखंडी सांगडा हटविण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे

Mahagaon Bribe Case : अंगणवाडी मदतनीस नियुक्तीसाठी लाचेची मागणी; महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT