CM Eknath Shinde Sakal
महाराष्ट्र बातम्या

CM Shinde : 'मराठी राज्यात हे चाललंय काय?' मुख्यमंत्र्यांनी गुजराती भाषेतून केली भाषणाची सुरूवात

आम्हाला स्टॅलिन सारखा स्वतःच्या भाषेचा अभिमान बाळगणारा आणि मान राखणारा हवाय, गुजरातचा गुलाम नाही अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.

दत्ता लवांडे

मुंबई : "महाराष्ट्र राज्य हे मराठी भाषिकांचे राज्य म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्राचे हृदय असलेली मुंबईसहित संयुक्त महाराष्ट्र व्हावे यासाठी अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली होती. पण या राज्यात आज गुजरातीचे दिंडोरे पिटवले जात आहेत. आज महाराष्ट्राला किडके मुख्यमंत्री मिळाले आहेत. त्यांना मराठी बोलण्याची लाज वाटते आणि आम्हाला त्यांची लाज वाटते" अशा तडकाफडकी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणावरून नेटकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.

ठाणे येथील आपल्या भाषणाची सुरूवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुजराती भाषेतून केली आहे. २० जून रोजी सायंकाळी ही सभा झाली. गुजराती बांधवांना संबोधित करताना त्यांनी थेट गुजराती भाषेतून सुरूवात केल्यामुळे मुख्यमंत्र्यांना सभेत टाळ्यांचा प्रतिसाद मिळाला. यासंदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. "आम्हाला स्टॅलिन सारखा स्वतःच्या भाषेचा अभिमान बाळगणारा आणि मान राखणारा हवाय, गुजरातचा गुलाम नाही, १०७ हुतात्मांचा आणि मराठी भाषिकांचा अपमान केल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, मराठी राज्यात हे चाललंय काय? हेच का ते बाळासाहेबांचे विचार" अशा संतप्त प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT