maratha reservation esakal
महाराष्ट्र बातम्या

Video : ''मुख्यमंत्र्यांनीच जरांगे पाटलांना उपोषणाला बसवलं अन् गृहमंत्र्यांनी...'' नाना पटोलेंचा खळबळजनक आरोप

संतोष कानडे

मुंबईः मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यातल्या अंतरवाली गावामध्ये मनोज जरांगे यांनी सतरा दिवस उपोषण केलं. मात्र जरांगेंना उपोषणाला मुख्यमंत्र्यांनी बसवलं होतं, असा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. त्यांच्या विधानामुळे राज्याच्या राजकारणामध्ये नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.

शनिवारी छत्रपती संभाजी नगर येथे मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आलेली होती. सरकारने तब्बल ४५ हजार कोटी रुपयांच्या विकासकामांची घोषणा मराठवाड्यासाठी केली आहे. मंत्रिमंडळ बैठीनंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन याची माहिती दिली.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी मंत्रिमंडळ बैठकीवरुन सरकारवर ताशेरे ओढले तर जालन्यात झालेल्या मराठा आरक्षण उपोषणावर प्रश्न उपस्थित केले. मनोज जरांगे पाटलांना मुख्यमंत्र्यांनीच उपोषणाला बसवलं, असा थेट आरोप पटोलेंनी केला आहे.

नाना पटोले म्हणाले की, जालन्यामध्ये मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरु होतं. ३१ तारखेच्या मध्यरात्रीच आंदोलक संतप्त झाले. मात्र १ तारखेला तीन वाजता सौम्य लाठीचार्ज करण्याचे आदेश गृहमंत्र्यांनी दिले. याच दिवशी मुंबईत इंडिया आघाडीची बैठक सुरु होती. या बैठकीवरुन लक्ष वळवण्यासाठीच लाठीचार्जची घटना घडवली गेली, असा आरोप पटोलेंनी केला.

नाना पटोले बोलले की, मुख्यमंत्र्यांनीच जरांगे पाटलांना उपोषणाला बसवलेलं होतं हे आता सिद्ध झालेलं आहे. कारण सौम्य लाठीचार्ज झाला आणि फडणवीसांनी माफीही मागितली. दोन समाजामध्ये भांडणं लावण्याचं काम सरकार करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

जरांगे पाटलांवरुन केलेल्या आरोपामुळे राज्याच्या राजकारणात आणि समाजकारणात वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण थेट उपोषणकर्त्यांवर नाना पटोले यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

आरक्षणावरुन बोलताना पटोले म्हणाले की, काँग्रेसची आरक्षणाबद्दलची भूमिका स्पष्ट आहे. जे मागास आहेत त्यांना न्याय मिळाले पाहिजे. कोणाच्या तोंडचा घास हिरावून नव्हे तर जातीनिहाय जनगणना करुन मिळालं पाहिजे. ओबीसींना २७ टक्के तसेच मराठा, धनगर यांना पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडून पुढे आरक्षण दिलं पाहिजे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिनचा 'अजिंक्य' मानला जाणारा विक्रम मोडला जाणार? ECB चा मास्टरस्ट्रोक, Joe Root सोबत केला खास करार

Yavatmal News : शिंदेसेनेचा गड आला, पण सिंह गेला! मध्यवर्ती बँकेत शिंदेसेना ठरली युतीत ‘मोठा भाऊ’; काँग्रेसची सत्ता उलथवली, प्रतिष्ठेच्या लढतीत दिग्गजांना धक्के

Karmad News : पीएम धन-धान्य कृषी योजनेतील कामगिरीबद्दल जिल्ह्याचा दिल्लीत गौरव

Ramlila Maidan Protest: रामलीला मैदानाचं एका दिवसाचं भाडं 1 लाख 21 हजार रुपये; पण यावर्षी केवळ तीनच दिवस उपलब्ध

MPSC Student Agitation : आंदोलन थांबले, पण असंतोष कायम; ‘एमपीएससी’ अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी अपूर्णच

SCROLL FOR NEXT