Uddhav thackeray Sakal
महाराष्ट्र बातम्या

''जुना विषाणू..''; मुख्यमंत्र्यांची नारायण राणेंवर बोचरी टीका

कार्तिक पुजारी

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेमुळे राजकीय वातावरण तापलं आहे. राणे-ठाकरे वाद पुढील काळात अधिक चिघळणार हे निश्चित आहे. नारायण राणे आणि त्यांची दोन मुले शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका करत आहेत

मुंबई- केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेमुळे राजकीय वातावरण तापलं आहे. राणे-ठाकरे वाद पुढील काळात अधिक चिघळणार हे निश्चित आहे. नारायण राणे आणि त्यांची दोन मुले शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका करत आहेत. त्यातच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाव व घेता नारायण राणे यांच्यावर निशाणा साधला आहे. नव्याने आलेल्या काही जुन्या विषाणूंचा बंदोबस्त करायचा आहे, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी राणेंना लक्ष्य केले. उद्धव ठाकरे गुरुवारी ‘इंडस्ट्रियल कॉन्क्लेव्ह २०२१’या कार्यक्रमात बोलत होते. (Maharashtra Latest News)

कोरोनाचा प्रभाव कमी होत आहे, पण काही जुने विषाणू नव्याने येत आहेत. त्याचे दुष्परिणाम राज्यावर होताना दिसत आहेत. त्यामुळे कोरोनासोबत त्यांचाही बंदोबस्त करावा लागले, असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत. मुख्यमंत्र्यांनी नाव न घेता नारायण राणे यांच्यावर शाब्दिक प्रहार केला. पर्यटनाला उद्योगाचा दर्जा दिल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. काही लोक राजकीय पर्यटन जास्त करत असतात. इकडून तिकडे आणि तिकडून इकडे, उद्या तिसरीकडे जात असतात, असं म्हणत त्यांनी राणेंच्या पक्षांतरावर टोला लगावला.

नारायण राणे यांनी माध्यमांशी बोलताना 'अटक करायला मी काय साधारण माणूस आहे का?' असं वक्तव्य केलं होतं. या त्यांच्या वक्तव्याचाही मुख्यमंत्र्यांनी समाचार घेतला. तुम्ही सामान्य नाही तर तुमच्या मोठेपणाचा सामान्य लोकांना काय उपयोग. कोरोनामुळे रोजीरोटीसाठी झगडणारे लोक तुमच्या मोठेपणाचं काय करतील, असं मुख्यमंत्री म्हणाले.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या 'कानशिलात लगावली असती' या नारायण राणेंच्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला. राणेंविरोधात विविध ठिकाणी शिवसैनिकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली, त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करत पोलिसांनी राणेंना अटक केली. चार तासांनंतर त्यांना महाड कोर्टाने जामीन दिला. राणेंच्या अटकेमुळे राणे-ठाकरे वाद पेटणार आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फेऱ्या अधिक तिखट होणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FDA Blood Donation Rules : रक्तदान शिबिरांबाबत आयुक्त तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय!

Manoj Jarange On Farmer Relief : "५ हजारांसाठी शेतकऱ्यांनी बँकेच्या रांगेत मरायचं का?"; मनोज जरांगेंचा सरकारवर थेट हल्लाबोल, म्हणाले...

Latest Marathi News Update: कॅफेबाहेर खुनाचा प्रयत्न करून पसार झालेल्या आरोपीला अटक

Social Media Backlash : "व्ह्यूजसाठी इतक्या खालच्या पातळीला..."; पत्नीला पाळीव कुत्र्याच्या भांड्यातून पाणी पाजले, यूट्यूबर सौरभ जोशीवर नेटकरी भडकले!

Jailer 2 Movie Review : रजनीकांतच्या 'जेलर २'चा प्रेक्षकांवर प्रभाव कसा? वाचा रिव्ह्यू

SCROLL FOR NEXT