Uddhav Thackeray Team eSakal
महाराष्ट्र बातम्या

अहमदनगर: मुख्यमंत्र्यांकडून आगीच्या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश

अहमदनगरमध्ये जिल्हा रुग्णालयाला आग लागून मोठी दुर्घटना घडली.

सुधीर काकडे

अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात झालेल्या घटनेत १० रूग्णांचा मृत्यू झाला असून, मृत्यूचा आकडा वाढण्यची शक्यता आहे. या घटनेतील अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. जिल्हा रुग्णालयातील आयसीयु वॉर्डात आज आग लागून झालेल्या दुर्घटनेसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोकसंवेदना व्यक्त केली असून याप्रकरणी सखोल चौकशी करून हलगर्जीपणास जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

आगीची घटना कळताच मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी तसेच मुख्य सचिव यांच्याशी बोलून तातडीने सध्या उपाचारधिन रूग्णांना उपचार मिळण्यात काही अडचणी येणार नाही ते पाहण्यास सांगितले असून जिल्हाधिकाऱ्यांनी या दुर्घटनेची सखोल चौकशी करून अहवाल सादर करावा असे निर्देश दिले आहेत.

दरम्यान, अमहमदनगरमध्ये झालेल्या या घटनेची चौकशी होईल अशी माहिती मलिक यांनी दिली होती. रूग्णालयात कोरोनाचे रुग्ण होते. यापूर्वी अशा घटना झाल्या होत्या तेव्हाच स्पष्ट सुचना देण्यात आल्या होत्या की, फायर ऑडीट केल्या शिवाय रुग्णालय चालवता येणार नाही. त्यामुळे या नवीन आयसीयुचं फायर ऑडीट झालं की नाही याची चौकशी करून दोषी असतील त्यांना कठोर कारवाई केली जाईल अशी प्रतिक्रिया राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब चालकांनो लक्ष द्या! ओला-उबर चालवायची असेल तर आधी ५ दिवसांचे प्रशिक्षण अनिवार्य; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

IND vs ZIM: "जे प्रॅक्टिसमध्ये करतो, तेच मॅचमध्येही..." वैभव सूर्यवंशी 'प्लेअर ऑफ द सीरिज' पुरस्कार जिंकल्यावर काय म्हणाला?

Police Station Fire : भायखळा पोलिस ठाण्यात अचानक आग; ऐतिहासिक इमारतीच्या पहिल्या मजल्याला आग

10 Point Action Plan for Women Safety : महिला सुरक्षेसाठी जिल्हास्तरावर 10 कलमी राष्ट्रीय कृती आराखडा; NCW चा महत्त्वाचा निर्णय

Rahul Gandhi: 'विद्यार्थ्यांवर पॅलेट गन चालवण्याचा आदेश कोणी दिला?' राहुल गांधींचा अमित शहांना थेट सवाल; पत्र लिहून मागितले उत्तर

SCROLL FOR NEXT