uddhav-thackeray-sad 
महाराष्ट्र बातम्या

उद्धव ठाकरेंच्या अडचणीत वाढ; यूपीत FIR दाखल होण्याची शक्यता

कार्तिक पुजारी

मुंबई- केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेनंतर भाजप आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपने उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात FIR दाखल करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल २५ ऑक्टोबर २०२० च्या दसरा मेळाव्यात आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. या मुद्द्यावरुन भाजप उद्धव ठाकरे यांच्याविरोधात FIR दाखल करणार आहे. (Maharashtra Latest News)

नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या कानशिलात लगावण्याची भाषा केली होती. त्यानंतर शिवसेना आक्रमक झाली. शिवसैनिकांकडून राणेंविरोधात विविध पोलीस ठाण्यास तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली. राणेंना जामीन मिळाला आहे. पण, शिवसेनेकडून ही कारवाई सुडबुद्धीतून करण्यात आल्याचा आरोप भाजपने केला आहे. आता शिवसेनेला जशासतसे उत्तर देण्यासाठी भाजप उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात तक्रार दाखल करणार असल्याची माहिती आहे.

दरम्यान, आमचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना हार घालायला हा योगी चप्पल घालून जातो. वाटते तर असे की, तीच चप्पल घ्यावी आणि त्याच्या थोबाडात हाणावी, असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात केलं होतं. याचा आधार घेत भाजप शिवसेनेला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करत आहे. व्हिडिओ भाजपने बुधवारी व्हायरल केला. यानंतर मुख्यमंत्र्यांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करावे, अशी मागणी भाजपकडून करण्यात येत आहे. त्यानंतर विविध पोलीस ठाण्यामध्ये मुख्यमंत्र्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. पुढे या प्रकरणात काय होतं याकडे सगळ्याचं लक्ष असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सीजेपीच्या 'तिरंगा मार्च'ला आडकाठी! दिल्लीतील सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा निर्णय; अभिजित दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, '100 ठिकाणी...'

Drunk and Driver : कोथरूडमध्ये ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’चा थरार; तीन ते चार जण किरकोळ जखमी, २४ वर्षीय कारचालक विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात

Mangalwedha News : मंगळवेढा तालुक्यात 4777 कुटुंबाचे धान्य ऐन दुष्काळात बंद

Manchar Water Issue : आंबेगाव तालुक्यात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईवर तातडीने नियोजन करा; प्रांताधिकारी अर्चना तांबे यांचे अधिकाऱ्यांना आदेश

PM नरेंद्र मोदींना भेटले Asiad पदकविजेते भारतीय खेळाडू, वैभव सूर्यवंशीच्या रिअॅक्शनचा Video होतोय Viral

SCROLL FOR NEXT