Maharashtra Weather Esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Weather: राज्यात थंडीचा कडाका वाढणार, अनेक जिल्ह्यातील तापमानात झाली घट

राज्यात गारठा वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्यात गारठा वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते तर अनेक भागात पावसाने हजेरी लावली होती. मात्र, आता राज्यातील ढगाळ वातावरण कमी झालं असून थंडी जाणवू लागली आहे. त्यामुळे नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस राज्यात कडाक्याची थंडी पडेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

जम्मू काश्मीरमध्ये सुरू झालेल्या बर्फवृष्टीमुळे महाराष्ट्रात देखील उत्तरेकडून येणारे थंड वारे सक्रिय झाले आहेत. त्यामुळे राज्यातील ढगाळ वातावरण कमी झालं असून लवकरच थंडी पडेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या वाढत्या थंडीचा चांगला परिणाम रब्बी हंगामाच्या पिकांवर होणार आहे. गहू, हरबरा पिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. चालू असलेल्या नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस राज्यात थंडीचा जोर अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पुणे आणि शहर परिसरात मंगळवारी (ता. १४) आणि बुधवारी (ता. १५) कोरड्या हवामानासह पहाटे धुक्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

दरम्यान, तापमानात होणारी घट आणि फटाक्यांची आतषबाजी यामुळे सध्या प्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे. परिणामी पहाटेच्या वेळी चक्क धुरके पसरत आहे. पुढील आठवडाभर मुख्यतः निरभ्र वातावरण कायम राहणार असून, किमान तापमानाचा पाराही साधारणपणे १७ अंशांच्या जवळपास कायम राहू शकतो, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला.

पुणे शहरात सोमवारी (ता. १३) १७.३ अंश सेल्सिअस इतक्या किमान आणि ३१.६ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. दरम्यान, सरासरीपेक्षा अद्याप किमान तापमानात वाढ कायम आहे. राज्यातील गारठा वाढण्याची शक्यता असून उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानात घट होण्याची चिन्हे आहेत.

सोमवारी (ता. १३) राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद औरंगाबाद येथे १४.८ अंश सेल्सिअस इतकी झाली. तर, कोकणात मात्र कमाल तापमानात सरासरीपेक्षा वाढ कायम आहे. विदर्भात किमान तापमानात सरासरीपेक्षा काहीशी घट झाली असून उत्तर महाराष्ट्रातील किमान तापमानातही घट होऊ लागली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोने खरेदी करणाऱ्यांची चिंता वाढली! अवघ्या 6 दिवसांत 50 हजारांनी महाग; आजचा ताजा भाव जाणून घ्या

Uday Samant on NEET Protest : 'नीट आंदोलन विरोधकांनी हायजॅक केलंय'; उदय सामंत यांचा गंभीर आरोप, पेपर फोडणाऱ्यांवर कठोर शिक्षा व्हायलाच हवी

Latest Marathi Update : राहुल गांधींची मोदींवर टीका; 'शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त केली, धर्मेंद्र प्रधानांना हटवा'

Mumbai Girl Stops Police Van : मुंबईच्या पोरी जिगरबाज! पोरांना अटक केलेली पोलीस व्हॅन पोरीनं अडवली; व्हायरल व्हिडिओ

५० ग्राम पावडर खिशात टाकेल, पूर्ण आयुष्य वाया जाईल...; मुंबई पोलिसांकडून आंदोलक विद्यार्थ्यांना थेट धमकी, VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT