A complaint filed against BJP MLA Ram Kadam in Barshi 
महाराष्ट्र बातम्या

भाजप आमदार राम कदम यांच्यावर बार्शीत गुन्हा दाखल

सुदर्शन हांडे

बार्शी : दहीहंडी कार्यक्रमात मुलींबद्दल बेताल वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपचे आमदार राम कदम यांच्यावर बार्शी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा मंदाताई काळे यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. 

3 सप्टेंबर रोजी घाटकोपर (मुंबई) येथे दहीहंडी कार्यक्रमात भाजपा प्रवक्ते आमदार राम कदम हजार होते. या कार्यक्रमातील भाषणावेळी त्यांनी महिलांचा अपमान व्हावा, या उद्देशाने प्रक्षोभक भाषण केले होते. मुलींची इच्छा नसेल तर लग्नासाठी पळून आणू, मला फोन करा. १००% मदत करणार असे वक्तव्य केले होते. टीव्हीवरून आमदार कदम यांचे हे वक्तव्य पाहून अनेक महिलांनी आपल्याकडे येऊन तक्रार केली. तसेच सदर वक्तव्याची मी स्वतः पाहणी करून खात्री करून फिर्याद दाखल करत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष मंदाताई काळे यांनी सांगितले. या वेळी अँड.विकास जाधव, करून हिंगमीरे आदी उपस्थित होते. 

राम कदम यांच्या पुतळ्याला जोडेमारो आंदोलन

मुलींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या निषेधार्त बार्शीतील गांधी शॉपिंग सेंटर जवळ शहरातील महिला व युवक यांनी राम कदम यांच्या पुतळ्यास जोडेमारो आंदोलन केले. यावेळी माजी नगराध्यक्षा मंगलाताई शेळवने, राष्ट्रवाडीच्या महिला जिल्हाध्यक्ष मंदाताई काळे, माजी नगरसेविका संगीत मेंनकुदळे, रिजवना शेख, अँड. राजश्री डमरे, करून हिंगमीरे, मीना धर्माधिकारी, सविता जाधव, उल्का गायकवाड,
राहुल देशमुख, विक्रमसिंह पवार, रवी गुंड, आकाश पाटील, आकाश जावळे, अमोल पेंडलवर, प्रसाद माने, विवेक कदम, गणेश कुऱ्हाडे, अतुल साळुंखे, अक्षय ठाकरे, विकास बारबोले, राकेश नवगिरे, विक्रांत पवार, सागर माने, महेश घोलप आदी उपस्थित होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Protest: उद्धव ठाकरेंचा दिल्लीतून सत्ताबदलाचा नारा! 'सीजेपी'च्या आंदोलनाला दिली भेट, दीपकेंचं केलं कौतुक

Supreme Court: 'अपार आयडी'ला सुप्रीम कोर्टाचा रेड सिग्नल! 26 कोटी विद्यार्थ्यांचा प्रश्न; कोर्टाचा मोठा निर्णय

Rahul Gandhi Protest: राहुल गांधींची तीन तासांनंतर सुटका; बाहेर आल्यानंतर प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया...

Marathi Culture: डॉ. रा. चिं. ढेरे यांच्या साहित्यिक वारशाचा गौरव; ‘संस्कृती-संशोधन केंद्रा’त चार पुस्तकांचे प्रकाशन

Ambad Highway Chaos: अंबडमध्ये महामार्गावर मोकाट जनावरांचा धुमाकूळ; वाहतुकीला अडथळा, नागरिकांचा जीव मुठीत

SCROLL FOR NEXT