Ashok Chavan Sakal
महाराष्ट्र बातम्या

Congress : चव्हाणांचा भाजपा प्रवेश काँग्रेस रोखणार? मान देऊन नाराजी दूर करण्याची शक्यता

नाराज असलेले चव्हाण भाजपामध्ये जाणार असल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगत आहेत.

सकाळ डिजिटल टीम

काँग्रेस नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण नाराज असल्याच्या चर्चा आहेत. या नाराजीमुळेच चव्हाण काँग्रेसमध्ये जाण्याच्या चर्चाही सुरू आहेत. या सगळ्यात आता काँग्रेसकडून चव्हाणांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे त्यांना काँग्रेसचं प्रदेशाध्यक्ष पद मिळण्याचीही शक्यता आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून अशोक चव्हाण काँग्रेसवर नाराज असल्याचं दिसून आलं. देवेंद्र फडणवीस तसंच भाजपा नेत्यांच्या भेटी, त्यानंतर भाजपा नेत्यांची सूचक विधानं यामुळे चव्हाणांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चांना जास्तच हवा मिळत होती. त्यामुळे अशोक चव्हाण भाजपामध्ये जाणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगत होत्या.

या सगळ्यात आता काँग्रेसने नवा डाव साधला आहे. चव्हाणांचा भाजपा प्रवेश रोखण्यासाठी आणि त्यांची नाराजी दूर करण्यासाठी काँग्रेसकडून त्यांना प्रदेशाध्यक्ष पद मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसकडून याबाबत विचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

APL 2026: Asian Games मध्ये पदकांची लूट करणारे भारतीय तिरंदाज पुन्हा सज्ज! कधी अन् कुठे पाहाता येणार भारतीय तिरंदाज

MPSC Student Agitation : टिळक चौकातील आंदोलनाकडे नेत्यांची पाठ; उणिवा दुरुस्त करा, पण पद्धत बदलू नका; विद्यार्थ्यांची भूमिका

Latest Marathi News Live Update : राज ठाकरे MPSC आंदोलकांच्या भेटीसाठी पुण्यात दाखल

Hingoli Fire Tragedy : हिंगोलीत फटाक्यांच्या गोदामाला भीषण आग; महिला आणि मुलासह दोघांचा मृत्यू, नगर परिषदेचे कर्मचारी गंभीर भाजले!

Viral Video : 'डोकंच नाहीये काही...' ईशान किशनचा रात्री १ वाजता विमानतळावर पारा चढला, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT