Nana Patole Esakal
महाराष्ट्र बातम्या

Nana Patole: 'आमच्या पक्षात चोंबडेपणा करू नये', नाना पटोलेंनी राऊतांना दिली तंबी

राऊत यांनी काँग्रेसचे अध्यक्ष खर्गे आहेत मात्र राहुल गांधींच निर्णय घेतात असं विधान केलं

अंकिता खाणे (Ankita Khane)

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजीनाम्याच्या घोषणेनंतर राज्यात मोठी खळबळ माजली आहे. या प्रकरणावर कालपासून राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान या प्रकरणावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसचे अध्यक्ष खर्गे आहेत मात्र राहुल गांधींच निर्णय घेतात असं विधान केलं. राऊतांच्या या वक्तव्यावर आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी चांगलाच समाचार घेतला आहे.

संजय राऊतांनी आमच्या पक्षात लुडबूड करू नये. संजय राऊत यांनी आमच्या पक्षामध्ये चोंबडेपणा करू नये ते आमच्या पक्षाचे प्रवक्ते नाही, असा घणाघातही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संजय राऊतांवर केला आहे.

तर 'राष्ट्रवादी भाजपबरोबर जाण्याची चूक करेल असे वाटत नाही. शरद पवार शाहू फुले आंबेडकर विचारांचे असून ते भाजप सोबत जाणार नाहीत असा आमचा विश्वास आहे अशा बातम्या भाजपकडून पेरल्या जाऊ शकतात असं पटोले म्हणाले आहेत. तर संजय राऊत यांनी चोंबडेगिरी थांबवावी. ते काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नाही. त्यामुळे त्यांनी आमचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या क्षमतेवर आणि गांधी कुटुंबाच्या तिथे प्रतिष्ठेबद्दल काहीही बोलू नये अशी तंबी नाना पटोले यांनी संजय राऊत यांना दिली आहे.

शरद पवारांच्या आत्मचरित्रात महाविकास आघाडी सरकार निर्माण होत असताना काँग्रेसच्या भूमिकेबद्दल जे लिहण्यात आलं आहे. त्याबद्दल योग्य वेळी उत्तर देऊ असंही नाना पटोले म्हणाले आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यासाठी सोनिया गांधी शरद पवार यांच्याकडे आल्या नव्हत्या. शरद पवार सोनिया गांधींकडे गेले होते. आज त्याबद्दल प्रतिक्रिया देणे योग्य नाही. ते मोठे नेते आहे ते काहीही बोलू शकतात लिहू शकतात योग्यवेळी त्याबद्दल प्रतिक्रिया देऊ, असे नाना पटोले म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal PM Balen Shah: नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह शंभर दिवसांमध्येच आले अडचणीत; सरकारविरोधात संघर्ष पेटला

IND vs ZIM 1st T20I: मयांक यादवने इतिहास रचला, पण कौतुक इशान किशनचे झाले! पहिल्याच चेंडूवर असे काय घडले? Video Viral

Ajit Pawar Statue: बारामतीत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राज्यातील पहिल्या पूर्णाकृती पुतळ्याचे भावपूर्ण लोकार्पण; तिरंगा सर्कलजवळ स्मृतीस्थळाला मान्यवरांची उपस्थिती

Latest Marathi Update : मुसळधार पावसामुळे मक्कासार गावात पूरसदृश परिस्थिती निर्माण

Delhi Lathi Charge Protest: दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याचा मोहोळमध्ये तीव्र निषेध; विविध पक्ष, संघटना व वकील संघटनेची भव्य रॅली

SCROLL FOR NEXT