nana patole politics Esakal
महाराष्ट्र बातम्या

Nana Patole: नाना पटोलेंना धक्का! समन्वय समितीसाठी दिलेली नावे वरिष्ठांनी नाकारली; कारण आलं समोर

कार्तिक पुजारी

मुंबई- लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने समन्वय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. समन्वय समितीमध्ये प्रत्येक पक्षाच्या तीन नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलेली नावे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी नाकारली आहेत.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाविकास आघाडीच्या समन्वय समितीत दिलेली नावं काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी नाकारली आहेत. काँग्रेसच्या केंद्रीय पातळीवरील वरिष्ठांची परवानगी न घेता पटोले यांनी नाव दिल्याची सूत्रांची माहीती आहे. (congress nana patol mva Coordinating Committee name list rejected)

नाना पटोले यांनी कळवलेली यादी अंतिम नसल्याचं महाविकास आघाडीतील मित्रपक्षांना कळवलं असल्यातं सांगण्यात येतंय. तसेच के सी वेणूगोपाल यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन करून यादीवर केंद्रीय पातळीवरून शिक्कामोर्तब झालं नसल्याचं कळवलं असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी एकत्र लढणार आहे. जागा वाटपाचा प्रश्न आणि इतर मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आहे. प्रत्येक पक्षाचे तीन नेते समन्वय समितीमध्ये आहेत. नाना पटोले यांनी दिलेली नावे नाकारली गेल्याचे वृत्त असल्याने त्यांच्यासाठी तो धक्का असल्याचं मानलं जातंय.

महाविकास आघाडीच्या समन्वय समितीमध्ये ठाकरे गटाकडून संजय राऊत, विनायक राऊत आणि अनिल देसाई, तर शरद पवार गटाकडून जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख या नेत्यांचा समावेश आहे. नाना पटोले यांच्याकडून पृथ्वीराज चव्हाण, बसवराज पाटील, नसीम खान यांची नावे वरिष्ठांना देण्यात आली होती. पण, वरिष्ठ नेत्यांच्या नाराजीमुळे यात बदल होण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : डोकेदुखी वाढणार?अंतरवालीतील महिलेचा पोलिसांत मोठा दावा,प्रकरण काय?

India Selection Committee: रोहित शर्माचा जवळचा मित्र घेणार अजित आगरकरची जागा? गुवाहाटीतील मिटिंगमधील अनुपस्थितीने चर्चेला उधाण

मुलाचं Instagram अकाउंट पालकांना थेट पाहता येतं का? Metaचे नियम काय?

Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमार यांना राजीनामा द्यावा लागणार का?

Latest Marathi News Live Update : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीवर प्रश्नचिन्ह; सचिन सानप यांची हायकोर्टात धाव

SCROLL FOR NEXT