Congress reacts to allegations made on sharad pawar and ncp by Raj Thackeray  Raj thackeray
महाराष्ट्र बातम्या

'...म्हणून राज ठाकरेंची निराशा'; भाषणावर कॉंग्रेसची प्रतिक्रिया

सकाळ डिजिटल टीम

आज मुंबईच्या शिवाजी पार्क येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मनसेच्या पाडवा मेळाव्यात (Gudi Padwa Melava 2022) जोरदार भाषण केलं. यामध्ये त्यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकार यासोबतच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर देखील टिका केली. त्यांनी राष्ट्रवादी(NCP) वर जातीवादाचे आरोप केले आहेत. या राज ठाकरेंच्या भूमिकेला कॉंग्रेसकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.

केवळ सत्तेत सहभाग मिळत नाही म्हणून राज ठाकरेंची निराशा झाल्याची प्रतिक्रिया कॉंग्रेसकडून देण्यात आली. कॉंग्रेसचे नेते अतुल लोंढे म्हणाले की, "वा साहेब आपण विकासाच्या ब्लू प्रिंटपासून राजकारण सुरु केलं होतं. विकासाच्या मुद्द्यावर बोलत होते. किती कोलांटउड्या मारल्या आज आपण जातीत्या राजकारणाचा आरोप शरद पवार यांच्यावर केले आणि स्वतः जातीच्या राजकारणावरुन धर्माकडं राजकारण नेण्याच्या गोष्टी करता.

ते पुढं म्हणाले की, 'आपणाला कल्पना असेल मध्ययुगीन काळात या धर्मांध राजकरणामुळे अधःकार युग आलं, जेव्हा वेज्ञानिक युग आलं त्यानंतरच जगानं विकास पाहिला. त्यामुळे फक्त सत्तेत सहभाग मिळत नाही, आपले आमदार निवडून येत नाहीत त्याची निराशा आपल्यामध्ये स्पष्टपणे झळकत होती. त्यामुळे विकासाच्या राजकारणाकडून धर्मांध राजकारणाकडे जाण्याचा जो आपला प्रवास आहे त्याला राजकारणातील अधोगती म्हणावे लागेल, असा टोला त्यांनी लगावला.

आपण जर जातीपातीच्या राजकारणात अडकून पडलो असतील, तर कोणतं हिंदू आणि हिंदुत्व घेऊन बसता. राज्यातील जातीपातीच्या राजकारणाला शरद पवार जबाबदार असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला. ते पुढं म्हणाले की, राष्ट्रवादीचा जन्म झाला, त्यानंतर जातीपातीचं राजकारण वाढलं. त्यापूर्वी जात ही अभिमान होती. मात्र राष्ट्रवादीच्या जन्मानंतर यांनी दुसऱ्या जातीचा द्वेष करायला शिकवलं. आम्ही जातीतून बाहेर पडणार नाही, तर मग आम्ही हिंदू कधी होणार, असं राज ठाकरे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Train Viral Video : वा रे पठ्ठ्या ! थेट ट्रेनच्या एसी डब्यातच थाटले पानाचे दुकान, अनोखा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

स्मृती मानधनाचा कर्णधार म्हणून आज पहिला सामना! दुसरीकडे भारताच्या स्टार महिला क्रिकेटपटूची अचानक निवृत्ती...

Woman Minister Husband Controversy : महिला मंत्रीच्या पतीचा इंग्लिश नजराणा, अनेकांसोबत ठेवले संबंध; मंत्री पत्नीला ठार करण्याचा रचला कट

Marathi News Live Updates: तिरंगा फडकवण्याच्या आवाहनानंतर दिल्लीतील टॉलस्टॉय मार्ग परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त

Petrol Diesel Price Today: सरकारचा मोठा निर्णय! पेट्रोल-डिझेलच्या टॅक्समध्ये बदल; महाराष्ट्रात 1 लिटरचा भाव किती?

SCROLL FOR NEXT