ajit pawar kirit somaiya esakal
महाराष्ट्र बातम्या

अजित पवार-जरंडेश्वर कारखान्याचं काय कनेक्शन?

सकाळ डिजिटल टीम

सातारा : भाजपा नेते किरीट सोमय्या (BJP leader kirit somaiya) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), ठाकरे सरकारवर निशाणा साधल्यानंतर त्यांनी हसन मुश्रीफांना (Hasan Mushrif) 'टार्गेट' करण्यास सुरुवात केलीय. सोमय्यांनी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. सोबतच जरंडेश्वर कारखान्यावरुन अजित पवारांना (Ajit pawar) किरीट सोमय्यांनी 'चॅलेंज' केले आहे. त्यांच्या आरोपामुळे महाराष्ट्रात राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालंय. मुश्रीफांविरोधात (Hasan Mushrif) आणखी एक घोटाळा उघडकीस आणू, असं किरीट सोमय्यांनी म्हटलं होतं. त्यासाठी ते कोल्हापूरला येत असतानाच, कऱ्हाडमध्ये त्यांना पोलिसांनी उतरवलं. कोल्हापूरला जात असताना तिथं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी त्यांना कऱ्हाडात पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर सोमय्या यांनी कऱ्हाडात आज पत्रकार परिषद घेऊन हसन मुश्रीफांसह शरद पवार, अजित पवार व ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

जरंडेश्वर कारखान्यावरुन अजित पवारांना 'चॅलेंज'

येत्या गुरुवारी पारनेर साखर कारखान्याला भेट देणार असून 27 तारखेला उद्धव ठाकरेंच्या 19 बंगल्यांचा घोटाळ्यांची पाहणी करणार असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित असलेल्या जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याची पाहणी करण्यास जाणार असून अडवून दाखवा, असं आव्हान किरीट सोमय्यांनी दिलं आहे. अजित पवारांमध्ये हिम्मत असेल, तर जरंडेश्वर कारखान्याच्या व्हॅल्यूएशनचे कागद का लोकांसमोर ठेवत नाहीत, असा सवाल किरीट सोमय्यांनी केलाय. 65 कोटीत कारखाना घेतला अन् 700 कोटीचं बँकेचं कर्ज घेतलंय. जरंडेश्वरच्या एका व्हॅल्यूअरचं नाव वैभव शिंदे आहे, असंही त्यांनी पवारांवर निशाणा साधताना नमूद केलंय.

अजित पवार-जरंडेश्वर कारखान्याचं काय कनेक्शन?

जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना हा प्रथम मेसर्स गुरू कमोडिटी प्रा. लि., कंपनीने विकत घेतला होता. मात्र, ही गुरू कमोडिटी कंपनी बनावट असल्याचा ईडीच्या अधिकाऱ्यांना संशय आलाय. जरंडेश्वर शुगर मिलने पुणे जिल्हा बँकेकडून सुमारे 700 कोटीचं कर्ज घेतलंय. गुरु कमोडिटीजनं 2010 मध्ये 65 कोटी 75 लाख रुपयांना खरेदी केला होता. हा जरंडेश्वर कारखाना सध्या मेसर्स गुरू कमोडिटी सर्व्हिसेस यांच्या मालकीचा आहे. ह्या कारखान्याला मेसर्स जरंडेश्वर शुगर मिल प्रा. लिमिटेडला भाड्याने देण्यात आलंय. ईडीने केलेल्या तपासात मेसर्स स्पार्कलिंग कंपनी ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांची पत्नी सुनेत्रा पवार यांच्याशी संबंधित आहे. अजित पवारांच्या म्हणण्यानुसार, हायकोर्टाच्या आदेशानं या कारखान्याचा लिलाव करण्यात आला आहे, असं नमूद केलं गेलंय.

अजित पवारांच्या नातेवाईकांचा कारखाना ईडीकडून जप्त

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्यात सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीनं मोठी कारवाई केलीय. या प्रकरणात ईडीनं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांचा साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखाना जप्त केलाय. ईडीची ही कारवाई अजित पवारांसाठी मोठा धक्का होता. हा कारखाना राजेंद्र कुमार घाडगे यांच्या मालकीचा असून घाडगे हे अजित पवार यांचे जवळचे नातेवाईक आहेत. राज्य सहकारी बँक घोटाळ्याचा तपास सुरू असताना जरंडेश्वर कारखान्याने बँकेकडून कर्ज घेऊन ते बुडवल्याचं स्पष्ट झालं. यावरुनच ईडीनं आता कारखान्यावर जप्तीची कारवाई केलीय.

जरंडेश्वर साखर कारखान्याशी आपला काही एक संबंध नसल्याचं अजित पवारांचं स्पष्टीकरण

कारखाना तोट्यात गेल्यामुळे माझ्या नातेवाईकांनी तो चालवण्यास घेतला होता. त्यांनी रितसर परवानगी घेऊन कारखान्याच क्षमता वाढवली आहे, असं अजित पवार म्हणाले होते. (2 जुलै 2021) एक पत्रकार परिषद घेऊन अजित पवार यांनी जरंडेश्वर कारखान्याशी संदर्भात आपल्यावरील सर्व आरोपांना उत्तर दिलं होतं. पवार म्हणाले होते, मुंबई हायकोर्टाने साखर कारखान्यांना 1 वर्षाची मुदत द्यायला सांगितली होती. त्यानंतर ते कारखाने विक्रीस काढण्यास सांगितले होते. त्यामध्ये जरंडेश्वर कारखानाही होता. तो कारखाना घेण्यासाठी 12 ते 15 कंपन्यानी टेंडर दाखल केल होतं. गुरू कमोडिटी कंपनीने तो कारखाना खरेदी केला. तो कारखाना BVG ग्रुपने तो कारखाना चालवण्यासाठी मागितला. पण त्यांना पहिल्या वर्षात तोटा झाला. त्यानंतर माझ्या नातेवाईकांनी तो चालवायला घेतला. त्यांनाही त्यात तोटा झाला. त्यांनी रितसर परवानगी घेऊन कारखान्याची कॅपसिटी वाढवली. त्यासाठी कर्ज घेतलं, त्यात पुणे जिल्हा सहकारी बँक आणि इतर बँक आहेत. त्याचं रिपेमेंट व्यवस्थित चालू आहे. तो गुरू कमोडिटी च्या नावाने असल्याने ईडीने त्यावर टाच आणली आहे.

सातारा जिल्हा बँकेलाही ईडीची नोटीस

जरंडेश्वर कारखान्यावर सक्तवसुली संचालनालयाने जप्तीची कारवाई केल्यानंतर या कारखान्याला कर्ज दिलेल्या सातारा जिल्हा बँकेलाही ईडीने नोटीस बजावली होती. यामध्ये कर्ज पुरवठा कशाच्या आधारावर केला आहे, त्याची परतफेड नियमित होतेय का?, याची माहिती ईडीने मागितली होती. कारखान्याकडून सक्षम तारणावरच कर्जपुरवठा केला असून त्यांचे कर्ज परतफेडीचे हप्ते वेळेवर येत असल्याने आम्ही ईडीच्या नोटिशीला सक्षमपणे उत्तर देऊ, असं जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी सांगितले होते.

हसन मुश्रीफ हिशेब अजून का दिला नाही?

हसन मुश्रीफ साहेब, 127 कोटी रुपये आपल्या कंपनीत मनी लाँड्रिंगचे आले, त्याचा हिशेब अजून का दिला नाही? पवार साहेब ही तुमची व्यूहरचना तर नाही ना?, असा सवाल देखील भाजप नेते सोमय्या यांनी उपस्थित केलाय. आप्पासाहेब नलावडे सहकारी साखर कारखान्यात मुश्रीफांनी 100 कोटींचा घोटाळा केला, तर सेनापती घोरपडे कारखाना आणि या कारखान्यात 50 कोटींचे व्यवहार झालेत. हे सरकार शरद पवार चालवत असून याची माहिती त्यांनाच आहे, असंही त्यांनी म्हटलंय. सरकार, हसन मुश्रीफांच्या स्वागतासाठी जनसमुदायाला परवानगी देतं. मग, मला कोल्हापुरात येण्यास परवानगी का नाही, असा सवालही सोमय्यांनी उपस्थित केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Politics: मतांसाठी उमेदवार घासत आहेत भांडी; पश्‍चिम बंगालमध्‍ये नवा फंडा; सभांपेक्षा मतदारांशी ‘जवळीक’ महत्त्वाची..

Registrar Dairy Department Transferred : रात्रीतून सुत्रे फिरली गोकुळच्या राजकारणाला नवे वळण, थेट दुग्ध विभागाच्या निबंधकांची उचलबांगडी; सभासद नोंदणी वाद भोवला

Vidhan Parishad Election: विधान परिषदेसाठी भाजपमध्ये 'ही' नावे चर्चेत, आमदारकीसाठी 'फिल्डिंग' लावायला सुरुवात, कुणाला मिळणार संधी?

India Petrochemical Duty Exemption : सरकारचा मोठा निर्णय ! ४० प्रमुख पेट्रोकेमिकल्सवरील आयात शुल्कात सूट,'या' उद्योगांना दिलासा

Latest Marathi News Live Update : गौतम अदानी अयोध्येत दाखल

SCROLL FOR NEXT