corona sakal media
महाराष्ट्र बातम्या

Corona Update: राज्यातील 'या' मंडळात एकही मृत्यू नाही, जाणून घ्या सविस्तर

मिलिंद तांबे

मुंबई : राज्यात आज 123 कोविडबाधित रुग्ण (Corona Deaths) दगावले. मृतांचा एकूण आकडा 1,31,552 वर पोहोचला आहे. नागपूर आणि अकोला मंडळात (Nagpur and akola) आज एकही मृत्यूची नोंद झाली नाही. आजही ठाणे (Thane) मंडळात सर्वाधिक 38 तर पुणे मंडळात (pune) 19 मृत्यूची  नोंद झाली. तर औरंगाबाद 5,कोल्हापूर 30,नाशिक 21 तर लातूर मंडळ 10 मृत्यू नोंदवले गेले. राज्यातील मृत्यूदर 2.9 % इतका आहे. ( Corona update nagpur and akola region no corona deaths today-nss9)

राज्यात आज दिवसभरात 6,843 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 62,64,922 झाली आहे.राज्यात ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी होऊन 94,985 इतकी आहे. आज दिवसभरात 5,212 रुग्ण बरे होऊन घरी गेले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 60,35,029 इतकी आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण  96.33 % एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4,68,46,984 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 62,64,922 (13.37 %) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5,17,362 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 3,506 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुम्ही जे खाताय ते खरंच सुरक्षित आहे का?, खरेदी करण्याआधी हे तपासा... तुकाराम मुंढेंनी सांगितली महत्त्वाची गोष्ट

MPSC Paper Leak : पेपरफुटीला लव्ह स्टोरी नाही, सत्ताधारी जबाबदार; काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप

U19 IND vs U19 AUS: सेहवाग - द्रविडची मुलं आता भारतीय संघात! ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामन्यांसाठी युवा संघाची घोषणा

Marathi News Live Updates : बेरोजगारांच्या हक्कांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची पुण्यात भव्य रॅली

Parel-Chinchpokli: ईद-मिलादच्या मिरवणुकीदरम्यान राडा! धक्काबुक्की, दगडफेक अन् धार्मिक घोषणाबाजी; परळ-चिंचपोकळीत तणाव, Video Viral

SCROLL FOR NEXT