corona delhi 300 covid infected arvind kejriwal hospital health  corona
महाराष्ट्र बातम्या

Corona Virus: महाराष्ट्रात दोन महिन्यानंतर पहिल्यांदाच कोरोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद

Corona Virus: कोरोना विषाणूने विश्रांती घेतल्याची स्थिती निर्माण झाली असताना मुंबईतून एक काळजी वाढवणारी बातमी समोर आली आहे

सकाळ डिजिटल टीम

Corona Virus:

मुंबई- कोरोना विषाणूने विश्रांती घेतल्याची स्थिती निर्माण झाली असताना मुंबईतून एक काळजी वाढवणारी बातमी समोर आली आहे. गेल्या काही महिन्यानंतर पहिल्यांदाच कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्याचे राज्य सरकारकडून कळवण्यात आले आहे. सरकारने असं स्पष्ट केलंय की, हा मृत्यू या महिन्यात झालेला नसून जुलै महिन्यात झाला आहे. फक्त त्याची नोंद बुधवारी घेण्यात आलेली आहे. टाईम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील बातमी दिली आहे.

मृत्यू झालेला रुग्ण 75 वर्षीय पुरुष असून त्याला लिव्हरचा कँन्सर होता, अशी माहिती बीएमसी आरोग्य अधिकारी डॉ. दक्शा शहा यांनी दिली. त्यांनी सांगितलं की, रुग्णाला कोरोना विषाणूची बाधा झाली होती, पण मृत्यूचे ते प्राथमिक कारण नाही. जुन आणि जुलै महिन्यात शहरामध्ये एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू नोंदला गेला नव्हता.

जुलैमध्ये एक मृत्यू झाला होता, पण तो बुधवारी नोंद करण्यात आला. डॉक्टरांनी सांगितलं की, कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. तसेच चाचण्या घेण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. राज्यात बुधवारी 14 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झालीये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi Update : पुणे -मुंबई जुना महामार्गावर वंचित कडून रास्ता रोको

रवी शास्त्रींनी निवडला भारत-इंग्लंडचा All Time XI संघ; धोनी कर्णधार, तर गांगुलीला मात्र...

Anganwadi Nutrition: अंगणवाडीत नोव्हेंबरपासून मिळणार ‘व्हेज पुलाव’; कुपोषणाविरुद्ध पाऊल, पोषण आहार झाला अधिक रुचकर

Ambabai Temple Restoration : ब्रेकर आणि ग्राईंडरचा वापर! अंबाबाई मंदिराच्या संवर्धनात मोठी हेरफेर; पुरातत्त्व विभागाविरोधात हिंदुत्‍ववादी संघटनांसह सर्वपक्षीय आक्रमक

Mumbai Girl Stops Police Van : मुंबईच्या पोरी जिगरबाज! पोरांना अटक केलेली पोलीस व्हॅन पोरीनं अडवली; व्हायरल व्हिडिओ

SCROLL FOR NEXT