Coronavirus esakal
महाराष्ट्र बातम्या

Coronavirus : राज्यातील ८ जिल्ह्यासाठी ‘चेंबर’चा मदतीचा हात

नामदेव कुंभार

पुणे - कोरोनाचे (Coronavirus) सर्वाधिक रुग्ण संख्या असलेले आणि पुरेशी साधनसामग्री नसलेल्या राज्यातील आठ जिल्ह्यांच्या मदतीसाठीही पुणे प्लॅटफॉर्म फॉर कोविड रिस्पॉन्सने (PPCR) पुढाकार घेतला आहे. त्यासाठी आता पुण्यातील उद्योगांचे पाठबळ त्यांना लाभले आहे. त्यआमुळे आता राज्यभर पुण्याची (Pune) मदत पोचू लागली आहे. राज्यात चंद्रपूर, भंडारा, पालघर, लातूर, नगर, नाशिक, ठाणे आणि नागपूर या जिल्ह्यांत कोरोना रुग्णांची (Coronavirus) संख्या वाढत आहे. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत या जिल्ह्यांत कोरोना रुग्ण, त्यांचे मृत्यूचे प्रमाण आणि रुग्णांच्या वाढीचा वेग जास्त असल्याचे राज्य सरकारच्या अहवालांतून आढळले आहे. त्यामुळे मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज ॲड ॲग्रीकल्चरच्या (MCCI) पीपीसीआरने पुढाकार घेतला आहे.

कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी सुरू केलेल्या ‘मिशन वायू’तंर्गत सिंगापूरहून ४ हजार ऑक्सिजन कॉन्स्ट्रेंटर आणि अडीच हजार बायपॅक व्हॅंटेलिटर पीपीसीआरने आणले आहेत. शहरांच्या तुलनेत ग्रामीण भागांतील आरोग्य केंद्रांची परिस्थिती गंभीर आहे. तेथे पुरेशा आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या तर, उपचारासाठी शहराकडे येण्याचे त्यांचे प्रमाण कमी होईल. त्यातून त्यांचा खर्च आणि शारिरीक दगदग वाचेल, या उद्देशाने ग्रामीण भागावर पीपीसीआरने लक्ष केंद्रीत केले आहे, अशी माहिती चेंबचे महासंचालक प्रशांत गिरबने यांनी दिली. आलेली मदत प्राधान्याने आठ जिल्ह्यांत तसेच अन्य जिल्ह्यांतही दिली जात आहे. त्यासाठी त्या-त्या भागांतील जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला जात आहे. त्यांच्याकडे ऑक्सिजन कॉन्स्ट्रेंटर किंवा बायपॅक व्हॅंटिलेटर पुरविला जात आहेत. पीपीसीआरने केलेल्या मदतीचा वापरही त्या जिल्ह्यांतील रुग्णालयांनी सुरू केला आहे. मिशन वायूतंर्तगत नागरिकही आपला सहभाग नोंदवू शकतात. त्यासाठी ‘एमसीसीआयए’ किंवा ‘पीपीसीआर’च्या फेसबुक पेजवर तपशील उपलब्ध आहे.

अशी पोचली आठ जिल्ह्यांत मदत

मिशन वायूतंर्गत ऑक्सिजन कॉन्संट्रेटर आणि बायपॅक व्हॅंटिलेटर कोरोनाबाधित आठ जिल्ह्यांत गरजेनुसार पाठविण्यात येत आहेत. तसेच प्रत्येक जिल्ह्याची परिस्थिती पाहून त्यांना आवश्यकतेनुसार मदतही करण्यात येत आहे. आठही जिल्ह्यांसाठी स्थानिक पातळीवर निधी संकलनासाठी आवाहन करण्यात आले आहे. त्यालाही स्थानिक, राज्यांतील आणि परदेशातील नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. केवळ नगर शहरासाठीच गेल्या आठ दिवसांत सुमारे ६० लाखांचा निधी जमा झाला आहे. तसेच काही जिल्ह्यांत देण्यात आलेली उपकरणे तेथील रुग्णांची संख्या कमी झाल्यावर ती उपकरणे अन्यत्र पुरविण्याचेही नियोजन असल्याचे गिरबने यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tesla Roadster Video : 'हवेत उडणारी कार'? Elon Musk यांनी स्वप्न प्रत्यक्षात उतरवले; सेकंदात ६०ची स्पीड अन् ग्रॅव्हिटीची ऐशीतैशी...

Sunlight at Night: आता रात्रीही मिळणार सूर्यप्रकाश! अमेरिकेची कंपनी भारताच्या मदतीने अंतराळात पाठवणार ‘स्पेस मिरर’... कसं करणार काम?

Navi Mumbai: १० टक्के पाणीकपात हटणार, नवी मुंबईत २४ तास पाणीपुरवठा मिळणार; गणेश नाईकांची मोठी घोषणा

Marathi News Live Updates: निळवंडे धरणातून प्रवरा नदीत पाणी सोडले, उत्तर अहिल्यानगरमधील नागरिकांना मोठा दिलासा; पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्याची आशा

Water Conservation: दुष्काळी धाराशिवला ‘एआय’चे वरदान! उसासाठी पाण्याचा भरमसाठ उपसा टळला; ७७० शेतकऱ्यांच्या प्रयोगाने बदलले चित्र

SCROLL FOR NEXT