fight  sakal
महाराष्ट्र बातम्या

Crime: हॅाटेल व्यावसायिकाला मारहाण करून साडेसात लाख रूपयांचा ऐवज लुटला

प्रफुल्ल भंडारी

दौंड शहरात एका ज्येष्ठ हॅाटेल व्यावसायिकाला मारहाण करून साडेसात लाख रूपयांचा ऐवज लुटण्यात आला आहे. चोरट्यांनी ४ लाख ४० हजार रुपयांच्या रोकडसह सोन्याचे दागिने लुटून नेले आहे.

दौंड - कुरकुंभ मार्गावरील सहकार चौकाच्या पुढे हॅाटेल अशोका परमिट रूम व बिअर बारचे मालक अशोक बेनीप्रसाद अग्रवाल ( वय ७४, रा. हॅाटेल अशोका पाठीमागील अग्रवाल बंगला, दौंड) यांना चोरट्यांनी मारहाण केली आहे. २ डिसेंबर रोजी मध्यरात्री बंगल्याच्या छतावरील कौल काढून त्याद्वारे चोरट्यांनी बंगल्यात प्रवेश केला.

अशोक अग्रवाल व त्यांचा वाहनचालक अनिल शिरसाठ यांना पाइप आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करून सोन्याचे दागिने काढून घेण्यात आले. चोरट्यांनी बंगल्यातील कपाटांची उचकापाचक करून नासधूस केली.

चोरट्यांनी बंगल्यातील ४ लाख ४० हजार रूपयांची रोकड , हिरेजडित सोन्याची अंगठी, नवग्रहाचे खडे असलेली सोन्याची अंगठी, दीड तोळे वजनाचे तीन सोन्याचे पदक, अडीच तोळ्यांची सोनसाखळी, एक मोबाइल संच व सीसीटीव्ही यंत्रणेचा डिजीटल व्हिडिओ रेकॅार्डर, असा एकूण ७ लाख ६६ हजार ५०० रूपयांचा लुटून नेण्यात आला आहे, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

बंगल्याशेजारी दोन्ही बाजूला मुख्यमार्गालगत राज्य राखीव पोलिस दलाच्या जागेतील काटवन असल्याने चोरट्यांचा शोध लागला नाही. या प्रकरणी अशोक अग्रवाल यांच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी चार अज्ञात चोरट्यांविरूध्द जबरी चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT